नाशिक : येवला तालुक्यातील महालखेडा येथील नांदूरमध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यात एकाच शेतकरी कुटुंबांतील दोन भावांसह वडील असे तिघे जण वाहून गेले आहेत. सोमनाथ शिवराम गिते, कार्तिक सोमनाथ गिते, सत्यम सोमनाथ गिते अशी यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत.
या घटनेत महालखेडा येथील नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यात कांद्याला फवारणी करण्याच्या पंपात पाणी भरण्यासाठी एक मुलगा उतरला होता. तो पाणी भरत असताना त्याचा तोल जाउन तो वेगवान पाण्याच्या प्रवाहात पडला. तो वाहून जात असल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ व वडीलही पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने भाऊ व वडीलही वाहून गेले. आता घटनास्थळापासून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र कालव्याच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यामध्ये अडचणी येत आहेत.
Like Our Facebook page : https://www.facebook.com/NashikOnWeb