ylliX - Online Advertising Network

गोदावरीत सर्व धरणातून विसर्ग , सावधानतेचा इशारा, गंगेला पूर

धरणांतून गोदावरीत होंणारा विसर्ग पुढील प्रमाणे :
गंगापूर 2284 क्यूसेक्स
भावली 135 क्यूसेक्स
कश्यपी 422 क्यूसेक्स
आळंदी 687 क्यूसेक्स
दारणा 3216 क्यूसेक्स
पालखेड 5250 क्यूसेक्स
नांदूर मधमेश्वर 16788 क्यूसेक्स
होळकर पूल 6297 क्यूसेक्स
करंजवन 900 क्यूसेक्स
कडवा 2544 क्यूसेक्स
ओझरखेड 2637 क्यूसेक्स
वालदेवी 1050 क्यूसेक्स
वाघाड 1014 क्यूसेक्स
पुणेगाव 932 क्यूसेक्स
चनकापूर 1816 क्यूसेक्स
ठेंगोडा 6311 क्यूसेक्स
हरणबारी 523 क्यूसेक्स
केळझर 198 क्यूसेक्स
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


तरी सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे..
नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे 100% भरले आहे.त्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदावरी ,दारणा व इतर नद्यांच्या नदीपात्रात करण्यात येत आहे , यामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये.

विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू,पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावीव या भागातून वाहने तात्काळ बाहेर काढावीत.असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.