काही काळ पावसाने थोडी सुट्टी घेतली होती,मात्र पाऊस पुन्हा बरसला आहे. पावसाने ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे गोद्वारीला पुन्हा एकदा पूर स्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या अनेक गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे गोदावरी नदीपात्रात गाडगेमहाराज पुलाजवळ एक प्रवासी बस अडकली आहे.मात्र बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
गाडीचा व्हिडियो येथे पाहण्यासठी येथे क्लिक करा :https://youtu.be/CnyCUSUCqww
गंगापूर धरणातून जोरदार पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे पुन्हा नदीपात्रातील पाणी पातळी वाढली असून, धोका निर्माण झाला आहे.
ननाशी दिंडोरी १४८ मिमी, पेठ १३५ मिमी, हर्सूल १४० मिमी, सुरगाणा ११७ मिमी, बोरगाव १०७ मिमी, कोशिंबे ९७ मिमी, सुरगाणा ९३ मिमी, उमराळे दिंडोरी ८९ मिमी , वाडीवरे इगतपुरी ८५ मिमी. धरणगाव ८४ मिमी , इगतपुरी ७६ मिमी , दिंडोरी ७३ मिमी, बर्हे सुरगाणा ७८ मिमी,
पावसाचा अंदाज खालील हा skymetweather.com सहयोगाने देत आहोत.
28 जुलै – महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे येथे हलक्या सरी; नागपूर, औरंगाबाद, परभणी येथे उघडीप
मान्सूनचा जोर महाराष्ट्रात कमी झाला असून, पुढील काही दिवसांत मान्सूनची गती वाढण्याची शक्यता नाही.स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राजवळच्या भागात मान्सूनकरिता उपयुक्त हवामान प्रणालीच्या अभावामुळे येत्या काही दिवसात राज्यात कोरड्या हवामानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
तथापि, कोकण व गोवा विभागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु राहण्याची अपेक्षा आहे. याउलट मुंबई मध्ये एक दोन सरींची अपेक्षा असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.पुढील 24 तासांत, मध्य-पूर्व राजस्थानमधील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे उत्तर मध्य-महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने जळगाव, धुळे, नाशिक आणि मालेगाव याठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.तसेच पुणे आणि आजूबाजूच्या भागात देखील एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे, मात्र नागपूर, जालना, औरंगाबाद, नांदेड आणि परभणी येथे हवामान कोरडे राहिल.