ylliX - Online Advertising Network

Gmail and YouTube ची सेवा पुन्हा सुरु

मुंबई : भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे. ई-मेलसोबतच यू-ट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत (Gmail and YouTube down in India).

YouTube ची सेवा आज १४ डिसेंबर २०२० रोजी, साधारण तासभर बंद होती, भारतात दुपारी ५ नंतर बंद झालेली ही सेवा ६ वाजून ५ मिनिटांनी सुरु झाली. जगभरात काही ठिकाणी ही सेवा बंद होती, या पाठोपाठ गूगल आणि गूगलमीटची सेवा देखील बंद होती, यामुळे YouTube दिसत नाहीय, सेवा का बंद आहे, यावर जगभरात अनेक ठिकाणी चर्चा सुरु आहे. 

YouTube ची सेवा काही मिनिटांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद झाली आहे. Google चा YouTube हा सर्वात मोठा व्हीडीओ प्लॅटफॉर्म आहे. यामुळे अनेक ठिकाणी युझर्स, सब्सस्क्राईबर्स गोंधळात पडले आहेत. यूट्यूब क्रिएटर्सना देखील याचा धक्का बसला आहे. YouTube अनेक वेळा तांत्रिक दुरुस्ती असल्यासं YouTube क्रिएटर्सना कळवत असतं, पण यावेळी असं काहीही कळवण्यात आलेलं नाही. YouTube काय तांत्रिक अडचण अचानक आली आहे, याविषयी google कडून काहीही कळवण्यात आलेलं नाही.

भारतात जीमेल आणि युट्युब सेवा डाऊन झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटर, गुगल, युटुयब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

युट्यूबवर लॉग इन केल्यानंतरही युजर्सनला “something went wrong” हा मेसेज येतो आहे. जगातल्या काही देशांमध्ये गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु आहे असंही समजतं आहे. मात्र जीमेल आणि युट्यूब यांना एरर येतो आहे. दरम्यान युट्यूब डाऊन हा ट्रेंडही ट्विटरवर सुरु झाला आहे. याच प्रमाणे गुगल डाऊन आणि जीमेल डाऊन हे ट्रेंडही सुरु झाले आहेत. युट्यूब, जीमेल आणि गुगल डाऊन झाल्यानंतर जे ट्रेंड सुरु झाले आहेत त्यामध्ये अनेक युजर्सनी मीम्सही तयार करुन ट्विटरवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वेळापासून जीमेलवर क्लिक केल्यास किंवा रिफ्रेश केल्यास Temporary Error (500) असा संदेश येतो आहे.Gmail and YouTube

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.