ylliX - Online Advertising Network

लॉन्स, मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना परवानगी द्या – पालकमंत्र्यांकडे असोसिएशनची मागणी

नाशिक : लॉकडाऊनमुळे लॉन्स व मंगल कार्यालयात विवाह सोहळे पार पडण्यासाठी बंधने घालण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, लॉन्स चालक अडचणीत आले आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स पाळत केवळ ५० लोकांमध्ये विवाह सोहळ्यास मंजुरी मिळावी या मागणीचा विचार करून शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लाॅन्स चालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले. Permit Weddings Lawns Nashik

कोविड-१९ मुळे लागू करण्यात आलेल्या कलम १४४ मध्ये शिथिलता देऊन लॉन्स व मंगल कार्यालयात शासकीय आदेशानुसार लग्न करण्यात परवानगी देण्यात यावी यासाठी नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनच्या वतीने भुजबळांना निवेदन दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ तसेच असोसिएशनचे पदाधिकारी सुनील चोपडा, संदीप काकड, समाधान जेजुरकर, हेमंत निमसे आदी उपस्थित होते.

यावेळी नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशन यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर कलम १४४ मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असून लग्न कार्यासाठी ५० लोकांना जमण्यास परवानगी दिलेली आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या घरात किवा सोसायटीच्या परिसरात लग्नकार्य करत आहे. मात्र याठिकाणी कोरोनाचे संक्रमण होण्याच्या भीतीने परिसरातील नागरिक तक्रार करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या विधींना अडचणीत येत आहे.

शहरातील अनेक फार्म हाऊस तसेच हॉटेलमध्ये लग्न कार्य पार पडत आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व अटी शर्थीचे पालन करून मंगल कार्यालय तसेच लॉन्स याठिकाणी लग्न कार्य पार पडण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. Permit Weddings Lawns Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.