छिंदम यास नाशिकरोड कारागृहातून हाकला,आमच्या ताब्यात द्या – कार्यकर्त्यांची मागणी

दुसऱ्या कारागृहात हाकलून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

नाशिक – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय खालच्या भाषेत संभाषण करणारा अहमदनगर महापालिकेचा भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून तातडीने दुसऱ्या कारागृहात हाकला अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बिटको चौकात जोरदार निदर्शने करून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधिक्षक राजकुमार साळी यांना निवेदन दिले. अहमदनगर महापालिकेमधील कर्मचारी अशोक बिडवे यांना काम सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत संभाषण करणारा अहमदनगर महापालिकेचा भाजपचा महापौर श्रीपाद छिंदम यास नाशिकरोड कारागृहात ठेवण्यात आलेले आहे.

NCP
याप्रसंगी सामाजिक न्याय शहराध्यक्ष धनंजय निकाळे, दिलीप दोंदे, मोतीराम पिंगळे, रवींद्र जाधव, राहुल पगारे, नजीम शेख, भूषण घाटकर, सारंग जाधव, हृतिक तिवडे, गौरव मते, निरज जामधडे, नाना खैरनार, विकी कोराडे, वामन क्षिरसागर, सचिन लिंबेकर, मनोज पाळदे, निलेश शेजवळ आदींसह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावरण तंग होवून छिंदम यांच्या घरावर दगडफेक तसेच कार्यालयाची मोडतोड करण्यात येवून त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला. न्यायालयीन कोठडीत नगरच्या तुरूंगात डांबलेल्या छिंदम यांच्यावर तेथील कैद्यांनी हल्ला केल्याने त्यांच्या जिवीताला असलेला धोका पाहता नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले आहे.
श्रीपाद छिंदम याने केलेले कृत्य अतिशय घृणास्पद असून त्यामुळे तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. व जनसामान्यांच्या मनात या प्रकरणाच्या संतापाचा उद्रेक झालेला आहे.छिंदम यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात अहमदनगर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने छिंदम सध्या नाशिकरोड मध्यवर्ती आहे. नाशिक हि पावन भूमी असून सदरील अप्रवृत्तीचा व समाज विघटक कृत करणाऱ्या श्रीपाद छिंदम यास नाशिकच्या पुण्यभुमीत राहण्याचा अधिकार नाही .

त्यामुळे त्याला दुसऱ्या कारागृहात हाकलून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांनी बिटको चौकात निदर्शने आंदोलन केले. यावेळी छिंदम व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येवून त्यांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. याप्रसंगी पक्षाच्यावतीने कारागृह अधिक्षक साळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यांनी राज्य सरकारकडे भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Like our  Facebook Page Click here : https://www.facebook.com/NashikOnWeb/ 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.