आक्षेपार्ह सेल्फीची धमकी देत मैत्रिणीवर केला बलात्कार
नाशिक : मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेले असता मित्राने तिच्या सोबत अनेक फोटो घेतले, तर काही फोटो भडक अर्थात अश्लिल सेल्फी घेतले गेले होते. या सेल्फिंचा उपयोग करत मित्राने तुझ्या घरी दाखवतो अशी धमकी दिली.नंतर तिला जबरदस्ती करत लॉजवर घेवून जावून तिच्यावर बलात्कार केला आहे. हा प्रकार मुलीने अंबड पोलिसांना सागितला असून, पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
सविस्तर वृत्त असे, अंबड परिसरात राहत असलेल्या १६ वर्षीय मुलीची मैत्री १९ वर्षीय अमन प्रशांत सैंदाणे (२, शैलेश टी.एल.सोसायटी,सी टू भवन समोर, खुटवड नगर ) झाली होती. नंतर सोबत फिरणे झाले त्या नंतर संशयिताने सोबत सेल्फी घेतला होता. काही दिवसांनी ती मुलगी त्रिमूर्ती चौक येथे शिकवणी साठी जात होती.तेव्हा संशयित अमन तेथे आला आणि तिला सेल्फी दाखवत धमकी दिली की सोबत आली नाहीस तर हा सर्व प्रकार मी तुझ्या घरी दाखावील. घाबरलेल्या मुलीने अमन सोबत गेली.
हा मुलगा तिला त्र्यंबकरोड येथील मंत्रा लॉजवर घेवून गेला होता.तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिचा गैरफायदा घेतला होता. यानंतर हे प्रकरण असेच ऑगस्ट २०१६ ते जुलै २०१७ पर्यंत सुरु होते. तो मुलगा तिला नेहमी सेल्फीची धमकी देत असे आणि तिला लॉजवर घेवून जात असे, नंतर त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण सुद्धा सुरु केली होती. तिने नकार दिला तर तो तिला मारहाण करत असे आणि जबरदस्ती करत तिला घेवून अत्याचार करत असे.घडलेला हा सर्व प्रकार शेवटी तिने घरी सांगितला.घाबरलेल्या आणि त्रासलेल्या या मुलीने शेवटी पोलिस स्टेशनला धाव घेतली आहे. अंबड पोलिसांनी भा.दं.वि.क. ३७६,३२३,५०४,५०६ आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनचे सिनिअर इन्स्पेक्टर मधुकर कड हे तपास करत आहे.
लॉजचा प्रश्न :
वय जो पर्यंत कायदेशीर पूर्ण नाही तो पर्यंत हॉटेल अथवा लॉजमध्ये रूम मिळत नाही.मात्र या प्रकरणात मंत्रा लॉजवर हे टाळून या मुलाला रूम दिली गेली आहे. कोणतेही कायदेशीर अडवणूक केली गेली नाही.त्यामुळे पुन्हा या रस्त्यावर हॉटेलमध्ये नेमके काय सुरु आहे हे पोलिसांनी पाहणे गरजेचे ठरणार आहे. पोलिसांनी जर वचक निर्माण केला तर नक्कीच भविष्यात कोणतही मोठा अनुचित प्रकार घडणार नाही.