ylliX - Online Advertising Network

चौघांचा महिलेवर सामूहिक बलात्कार; वणी बसस्टँड परिसरातील धक्कादायक घटना

नाशिक । जिल्ह्यातील वणी बस स्टॅण्ड परिसरात बुधवारी (दि. 27) मध्यरात्री एका महिलेवर टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लागलीच आरोपींचा माग काढत तिघांना मध्यरात्री मुसक्या आवळल्या. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. girl raped by four at vani nashik

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मित्रासमवेत बुधवारी रात्री वणी एसटी स्टॅण्ड परिसरात आली होती. त्या ठिकाणी मित्राच्या ओळखीचे चौघेजण आले. चौघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चौघे पळून गेले.

ही घटना समजताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. एकजण फरार झाला असून, पोलीस त्याचा मागावर आहेत. girl raped by four at vani nashik

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील वणी येथील बस स्थानकावर 42 वर्षीय पीडित महिला आणि तिचा मित्र बसले होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या चौघांनी पीडित महिला आणि तिच्या मित्राला जीवे मारण्याची धकमी दिली. त्यानंतर त्यांनी आळीपाळीने पीडित महिलेवर बलात्कार केला. बुधावारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने वणी पोलिस ठाण्यात (Vani police Station) आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा (gang rape and atrocity) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत चौघांनाही बेड्या ठोकल्या. चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्हा हादरला आहे

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी विनयभंगाची घटना घडल्याचं समोर आलं होतं. अल्पवयीन मुलीला बळजबरीनं लॉजवर नेऊन विनयभंग केला. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातली ही घटना आहे. शाळेत जाणाऱ्या मुलीला तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावलं असं सांगून आरोपीनं कारमध्ये बसवलं. मुलगी कारमध्ये बसल्यानंतर आरोपीनं कार लॉजवर नेली आणि तिथं तिच्यावर अतिप्रसंग केला.

पीडित मुलीनं घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी दानिश खानला मारहाण केली आहे. सध्या आरोपी दानिशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

तोंडात बोळा कोंबून व्यावसायिक महिलेवर अत्याचार

नाशकात काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार केला आहे. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. पीडित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला. यानंतर आरोपीनं पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आहे

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.