मॉडेलिंगसाठी युवतीने रचला स्व:ताच्या अपहरणाचा डाव; पालकांकडे मागितली 7 लाखांची खंडणी

युवतीच होती या सर्व कारस्थानामागे

नाशिक मधील एका युवतीने मित्रांसमवेत मिळून स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचून पालकांकडे चोरीच्या मोबाईलवरून संपर्क साधत 7 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी अवघ्या काही तासात एका अल्पवयीन संशयितासह एकाला अटक केली असून युवतीच्याच सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. girl fake kidnapping juvenile friends help seven Lakh rupees extort

याप्रकरणात शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या सातपूर परिसरातील मध्यमवर्गीय कुटूंबात युवती राहत असून डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. सातपूर येथून ती अशोकस्तंभावरील लायन-माईंड इंग्लिश स्पिकींग कोर्ससाठी रोज सकाळी साडेसहा वाजता जाते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ती क्‍लासला आली. मात्र 10 वाजता परत घरी न आल्याने तिच्या आईने क्‍लासमध्ये फोन करून विचारले. त्यावेळी ती सकाळी 9 वाजताच क्‍लासमधून गेल्याचे कळाले.

दुपारी चार वाजेपर्यंतही ती घरी परतलेली नव्हती. पावणे पाच वाजेच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मुलीच्या आईला फोन आला आणि अज्ञात संशयिताने मुंबईतील वडाळ्यातून बोलत असून तुमची मुलगी पाहिले असेल तर 7 लाख रुपये तयार ठेवा असे बोलून फोन ठेवून दिला. girl fake kidnapping juvenile friends help seven Lakh rupees extort

त्यानंतर परत फोन केला आणि त्यावेळी थेट मुलींशीच संशयितांनी बोलणे करून दिले. घाबरलेल्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार बनाव रचणाऱ्या मुलीला मॉडेलिंग करण्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून तिने तिच्या ओळखीतील एक अल्पवयीन व दुसरा संशयित साहील महेंद्र भांगरे (20) यांच्यासमवेत बनाव रचला. दोघा संशयितांनी जळगावहून नाशिकला कामानिमित्ताने आलेल्या युवकाकडे एसएमएस पाठविण्यासाठी मोबाईल घेतला आणि पोबारा केला.

त्याच मोबाईलवरून संशयितांनी मुलींच्या सांगण्यावरून तिच्या पालकांना फोन केला आणि खंडणीची मागणी केली.पोलिसांनीही सुरुवातीला त्याच मोबाईलची माहिती एक दोन पथके तयार केली आणि जळगाव-चाळीसगावला रवाना केली. या पथकांनी मोबाईलच्या पत्तावरून संशयिताच्या घराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

मात्र त्याचा मोबाईल चोरून गुन्ह्यात वापरला जात असल्याची बाब समोर आली. मध्यरात्रीची वेळ झाल्याने पुन्हा तपासाची दिशा बदलली. शेवटी तिच्या संपर्कातील मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता पाथर्डी फाटा परिसरातील अल्पवयीन संशयित हाती लागला. त्याला पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने संपूर्ण  प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावरून दुसरा संशयित साहिलला अटक केल्यानंतर सदरची मुलगी एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. तिघांनीही गुन्ह्यांची कबुली दिली. girl fake kidnapping juvenile friends help seven Lakh rupees extort

girl fake kidnapping juvenile friends help seven Lakh rupees extort

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.