भाजपच्या शहरअध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड

तब्बल नऊ महिने रिक्त असलेले भाजपचे शहर अध्यक्षपदी अखेर नियुक्तीची घोषणा करण्यात आली असून, चर्चेत नसलेला चेहरा गिरीश पालवे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील नियुक्ती जाहीर केली आहे.

या बरोबर डॉ. सुभाष भामरे यांच्याबरोबरच किरीट सोमय्या , प्रवीण पोटे पाटील, योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील या आगोदर नवीन निवड होण्याअगोदर सर्व पदाधिकार्‍यांचे मत जाणून घेतले होते. सर्वच पदाधिकार्‍यांनी नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची त्यावेळी मागणी केली. त्यानुसार उद्योजक आशिष नहार, नाना शिलेदार, गिरीश पालवे या युवानेत्यांची नावे पक्षाकडे पाठवण्यात आली होती.

सोबतच चर्चेतील असलेले चेहरे सुनील केदार, नगरसेवक मुन्ना हिरे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उत्तम उगले, विश्वास कांबळे यांचीही नावे चर्चेत  होती.

एकदा पद उपभोगलेल्या व्यक्तींना पुन्हा महत्वाची जबाबदारी देण्याच्या शक्यतेने पक्षांर्तगत धुसफूस सुरु झाली होती. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात नवीन चेहरा असलेले गिरीश पालवे यांची नियुक्ती केली आहे.

तर भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी तर सहमुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मधू चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाठ, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर या सर्वांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पार्टी संघटनपर्व २०१९ अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानसाठी नाशिक महानगर सदस्यता नोंदणी सहसंयोजक म्हणून गिरीश पालवे यांची नियुक्ती या आगोदर करण्यात आली होती. नाशिक जिल्हा तसेच शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविलेले आहे. आ.बाळासाहेब सानप यांच्या कार्यकारिणीत भारतीय जनता पार्टीच्या महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली आहे. सर्व घटकांना विश्वासात घेवून तसेच वरिष्ठांशी सल्ला मसलत करुन आपण लवकरच नूतन महानगर कार्यकारिणी घोषित करु, असे नूतन शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले. गिरीश पालवे हे पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळतील असा विश्वास मावळते अध्यक्ष आ.बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.