ylliX - Online Advertising Network

घोटी टोल नाका : तरुणाचा मृत्यू, सर्वपक्षीय आंदोलन करत टोलनाका बंद

नाशिक : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ईगतपुरी येथील साईकुटीर समोर रस्त्यावरील खडयांमुळे नांदगावसदो येथील युवकाचा अपघाती मृत्यु झाला. या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या खड्यांमुळे तरूणाचा मृत्यु झाल्याची बातमी पसरताच सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगांवसदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यरात्री १२ वाजले पासुन टोलनाका बंद पाडला.Ghoti Toll Naka death young pothole Toll Naka  shutdown  all-party members agitation

हाच तो मोठा खड्डा ज्यामुळे युवकाला प्राण गमवावे लागले आहेत.

याबाबत सविस्तर माहीती अशी की मंगळवार रोजी रात्री साडे नऊच्या स़ुमारास नांदगांवसदो येथील शिवशक्ती युवक मंडळाचे कार्यकर्ते  पंढरीनाथ सुखदेव भागडे (२३) वर्ष हे रात्री साडेनऊच्या सुमारास मोटरसायकलने ( एम. एच. 15 एक. पी. 3041) घोटीहुन नांदगावसदो येथे घरी जात होते. यावेळी  बोरटेंबे गावाच्या पुढे साईकुटीर समोर असलेल्या खड्यात गाडीचे पुढील चाक गेल्याने ते रस्त्यात पडले. तेवढयात मागुन येणारी पिकअप ( गाडी नं. एम एच 04 जे. के. 6252 ) थेट त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.Ghoti Toll Naka death young pothole Toll Naka  shutdown  all-party members agitation

ही बातमी समजताच इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे व संदीप कीर्वे यांच्या नेतृत्वाखाली आगरी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी घोटी टोल प्लाझावर एकत्र येऊन आंदोलन सुरु केले. मध्यरात्री १२ वाजेपासुन वाहन धारकांकडुन टोल आकारणी बंद करत टोलनाका बंद केला. सकाळी अकरा वाजता टोल प्रशासनाने महामार्गावरील सर्व खड्डे त्वरीत बुजवुन पंढरीनाथ भागडे यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर टोलप्लाझाकडुन टोल सुरु करण्यात आला. या प्रसंगी उपअधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव आदी उपस्थित होते.Ghoti Toll Naka death young pothole Toll Naka  shutdown  all-party members agitation

 या आंदाेलनात सर्वफ्क्षीय पदाधिकारीइगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, संदीप कीर्वे, भागीरथ मराडे, मुलचंद भगत, प्रशांत कडु, रामदास आडोळे, भोलेनाथ चव्हाण, अॅड. हनुमंत मराडे, देविदास आडोळे, कैलास भगत, योगेश भागडे, मनिष भगत, नामदेव भागडे, शंकर भगत, दशरथ भागडे, विठ्ठल लंगडे यांच्यासह तालुक्यातील आगरी समाज मोठ्या संखेने सहभागी झाला होता. पंढरीनाथ भागडे अपघाती निधनामुळे नांदगांवसदो गावावर शोककळा पसरली असुन त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःख।चा डोंगर कोसळला आहे.Ghoti Toll Naka death young pothole Toll Naka  shutdown  all-party members agitation

प्रतिक्रीया 

मुंबई आग्रा महामार्गावर अनेक ठीकाणी दीड ते दोन फुट खोल खड्डे पडले आहेत. या खडडयामुळे येथे रोज अपघात होऊन अनेकांना मृत्युला सामोरे जावे लागत आहे.– संदीप कीर्वे.

प्रतिक्रीया : –

घोटी येथील टोलप्लाझा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे सोडुन वाहन धारकांकडुन दररोज लाखो रूपये  टोल आकारणीत मग्न आहे. महामार्गावरील खड्डे त्वरीत न बुजवल्यास महामार्ग बंद आंदोलन करू. – प्रशांत कडु. 

इतर महत्वाच्या बातम्या

आर्मी परिसरात तोफगोळ्याचा स्फोट: एक ठार, चार गंभीर जखमी

घशात अडकले खेकड्याचे कवच, दुर्बिण शस्त्रक्रिया करून काढले बाहेर

भारतरत्न वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, दि.24 ऑगस्टला रामकुंडात विसर्जन

ई-शॉपिंग मॉल बुडाला, कोट्यावधी रुपयांची फसवणूक. जास्त व्याजाला भुलले नाशिककर

अनैतिक सबंध : जेलरोड परिसरात एकाचा खून, आरोपीस अटक

लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 22 ऑगस्ट 2018

Ghoti Toll Naka death young pothole Toll Naka  shutdown  all-party members agitation
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “घोटी टोल नाका : तरुणाचा मृत्यू, सर्वपक्षीय आंदोलन करत टोलनाका बंद

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.