ylliX - Online Advertising Network

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG मध्ये 16 लाख उडवले

चंदीगड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. या दरम्यान मुलांमध्ये PUBG गेमची क्रेझ वाढली आहे. अनेकजण आपल्या रिकाम्या वेळेत PUBG गेम खेळत आहेत. या गेममुळे पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये 17 वर्षाच्या एका मुलाने आपल्या वडिलांनी साठवलेले 16 लाख रुपये PUBG गेमसाठी खर्च केले आहेत. घरच्यांनी ऑनलाईन अभ्यासासाठी मुलाला मोबाईल दिला होता.

वडिलांनी जमा केलेले 16 लाख  मुलाने PUBG गेममध्ये खर्च केल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. या मुलाकडे तीन बँकेंच्या अकाऊंटचा अॅक्सेस होता. ज्याचा उपयोग तो PUBG गेम मोबाईलमध्ये अपग्रेड करण्यासाठी वापरत होता. त्यासोबत तो आपल्या मित्रांचेही अॅप विकत आणि अपग्रेड करत होता. कुटुंबाला या घटनेची माहिती बँकेच्या ट्रान्जेक्शनमधून समजली. मुलाचे वडील सरकारी कर्मचारी आहेत.

“मुलगा सर्व ट्रान्जेक्शन आपल्या आईच्या मोबाईलवरुन करत होता आणि बँक रीलेटेड सर्व मेसेज डिलिट करत होता”, असं मुलाच्या वडिलांनी सांगितले. मुलाच्या कुटुंबियांना वाटत होत की, त्यांचा मुलगा स्मार्टफोनचा सर्वाधिक उपयोग आपल्या ऑनलाईन अभ्यासासाठी करत आहे. पण आता या घटनेनंतर कुटुंबियांनी मुलाला मोबाईल रिपेअरिंग दुकानावर कामाला लावले आहे. जेणेकरुन तो मोबाईलवर PUBG गेम खेळू शकणार नाही.

“मी त्याला घरी रिकामे बसू देणार नाही आणि अभ्यासासाठी मोबाईल फोनही देणार नाही”, असं मुलाच्या वडिलांनी सांगितले. यापूर्वीही PUBG गेमच्या अॅडिक्शनने अनेक घटना घडल्या आहेत. बऱ्याचदा हा गेम बॅन करा अशी मागणी अनेकांनी केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.