ylliX - Online Advertising Network

नाशिक भकास करून नागपूरचा विकास करू नका : खासदार संजय राऊत

रेणूका चौधरी पदावर होत्या तेव्हा कास्टींग काऊच होत असल्याचे बोलल्या नाहीत : खासदार संजय राऊत

नाशिक : कास्टिंग काऊचची संस्कृती कॉंग्रेसची असेल, शिवसेनेत मात्र महिला सुरक्षित आहेत. जेव्हा रेणूका चौधरी पदावर होत्या तेव्हा कास्टींग काऊच होत असल्याचे बोलल्या नाहीत! आता का बोलत आहेत? संसदेतही कास्टींग काऊच होत असल्याचा केलेला आरोप म्हणजे देशाच्या सर्वाेच्च सभागृह संसदेचा मोठा अपमान आहे. अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. Gaunt Nashik Developing Nagpur pharma industries MIHAN Project Sanjay Raut

नाशिक मध्ये झालेली करवाढ म्हणजे जनतेचे शोषण आहे, तुम्ही दिलासा देणार की शोषण करणार, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आयुक्त मुख्यमंत्री नेमतात, त्यांना तो अधिकार आहे. मात्र  जेथे हे  नाशिकचे सध्याचे आयुक्त जातात तेथे, तेथे वादग्रस्त निर्णय घेतात. यांना तुम्ही मंत्रालयात घेवून जा त्यामुळे राज्याचा महसूल वाढेल. नाशिक मध्ये नवीन उद्योग आले पाहिजे, ना की नाशिकचे उद्योग नागपूरला गेले पाहिजे नाशिक भकास करून नागपूरचा विकास करू नका, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

नाणार प्रकल्पाच्या विरोधात कोकणवासीय ठाम आहेत. लोकांचा विरोध लक्षात घेऊन प्रकल्प पुढे न रेटण्याचे शहाणपण सरकारने दाखवावे असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेल्या खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Gaunt Nashik Developing Nagpur pharma industries MIHAN Project Sanjay Raut

कॉँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांच्या कास्टींग काऊच आरोपावर टीका केली आहे. चौधरी इतके वर्षे सत्तेत होत्या. तेव्हा सत्ता हातात होती त्या  पदावर असताना त्यांनी यावर आवाज का उठवला नाही?, निवृत्त झाल्यानंतर बोलून काय उपयोग? या प्रकारची संस्कृती कॉँग्रेसमध्ये असेल. मात्र या त्यांच्या वक्तव्याने संसदेतील पुरूष आणि महिला खासदार यांचा आणि त्याचबरोबर सभागृहाचा मोठा अवमान झाला आहे असे राऊत म्हणाले. Gaunt Nashik Developing Nagpur pharma industries MIHAN Project Sanjay Raut

नाणार प्रकल्पाविषयी बोलताना ते म्हाणाले की शिवसेनेने कोकणवासियांचा विरोध दर्शवून मोठ्या प्रमाणत सरकारच्या समोर आणला आहे.  संयुक्त महाराष्ट्रसाठी गोळ्या झेलणारे कोकणवासीय आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध लक्षात घेतलाच पाहिजे. हा प्रकल्प लादणार नाही असे जर सरकार म्हणत असेल तर विरोध लक्षात घेऊन प्रकल्प न  करण्याचे शहाणपण सरकारने केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

Gaunt Nashik Developing Nagpur pharma industries MIHAN Project Sanjay Raut

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.