आडगांवकर ज्वेलर्स सराफ : बँकेत भरण्यासाठी आणलेली २८ लाख रु. रोकड लुटली

गंगापूर रोड वरील सारस्वत बँकेसमोरील  घटना gangapur road saraswat bank 28 lakh rupees looted today afternoon

नाशिक : दहा रुपयांची नोट पडली आहे असा बहाणाकरत आडगांवकर ज्वेलर्समधील कर्मचारी जो दुकानातील २८ लाख रुपये बँकेत भरणा करण्यासाठी आला होता त्याला लुटले आहे. ही घटना गंगापूर रोड येथील सरस्वत बँकेसमोर घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुपारी तीनच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे.gangapur road saraswat bank 28 lakh rupees looted today afternoon

सविस्तर वूत असे की, मंगळवारी (दि़३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील सराफी व्यवसायिक असलेले आडगांवकर ज्वेलर्समधील कर्मचारी त्यांच्या दुकानातील नियमित असे रक्कम भरायला गेले होते. आज त्यांच्याकडे  २८ लाख ६४ हजार २६८ रुपयांची रोकड होती ती  बँकेत भरण्यासाठी निघाले़ होते.  गंगापूररोडवरील मॉर्डर्न कॅफेजवळील सारस्वत बँकेत या पैशांचा भरणा होणार होता. सराफी कर्मचारी यांनी  दुचाकीवरून पैसे नेले़ होते तेव्हाचा  बँकेच्या बाहेर कर्मचारी पोहोचले असता त्यांच्या मागावर असलेल्या सात संशयितांनी तुमच्याकडील दहा रुपयांच्या नोटाचा बंडल  खाली पडल्याने असे  सांगितले़ त्यानुसार दहा रुपयांच्या नोटाचा बंडल  उचलत असलेल्या कर्मचा-याकडील रोकड संशयितांनी हिसकवून  लूटून नेली़ आहे. ही घटना इतक्या वेगात घडली की कर्मचाऱ्याला कळले नाही.

गंगापूर रोडवरील रोकड लुटीची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह पोलिस  घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरताील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली़ बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या संशयितांचा शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत़.

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.