धक्कादायक : गणेश विसर्जन वेळी किरकोळ वाद, तिघांना जाळण्याचा प्रयत्न, एक गंभीर

किरकोळ वाद किती विकोपाला जाईल याचे काही भाकीत करता येत नाही. असाच धक्कादायक प्रकार इगतपुरी येथे गणेश विसर्जन मिरवणूक वेळी झाला आहे. यामध्ये रागाच्या भरात तिघा युवकांना जीवे जाळण्याचा प्रयत्न झाला असून, एक गंभीर जखमी झाला आहे.  या सर्वाना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.Ganesh Visarjan Mirvanuk Igatpuri one try to fire up three person one serious 

हा फोन नुकताच बाजारात आला असून अनके नवीन फीचर्स त्यात आहेत… क्लिक करा !

Vivo V11 Pro (Starry Night Black, 6GB, in-Display Fingerprint Scanning) with Offers

या घटनेत प्रशांत बोरसे हा 60 टक्के भाजला असून, तो गंभीर आहे. इगतपुरीमधील कोपरी मोहल्ला परिसरात दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच तीन जणांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी कुणाल हरकारेला पोलिसांनी इगतपुरीमधूनच अटक केली आहे. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Ganesh Visarjan Mirvanuk Igatpuri one try to fire up three person one serious 

विसरर्जनावेळी झालेला किरकोळ वाद थेट एकमेकांना जाळल्यापर्यंत पोहचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यातील 2 जणांची प्रकृती योग्य आहे पण एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.Ganesh Visarjan Mirvanuk Igatpuri one try to fire up three person one serious 

हे तिघेही जण गणपती विसर्जन पाहण्यासाठी आले असल्याचं सांगण्यात येत आहे. पण दोन गटात किरकोळ कारणारून वाद झाला आणि त्यात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.

 

Ganesh Visarjan Mirvanuk Igatpuri one try to fire up three person one serious 

(बातमीचा फोटो फक्त विषयानुसार आहे. बातमीशी निगडीत नाही )

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.