नाशिक : लायन्स क्लब ऑफ नाशिक, कॉर्पोरेट पर्यावरण पूरक गणेश उत्सव २०१८ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत “श्रीं”ची मूर्ती आमची ‘दान’ तुमचे हा अभिनव उपक्रम राबविला जाणारा आहे. यामध्ये सुरेख गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण येथील पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती दान करण्यासाठी ठेवल्या जाणार आहेत.Ganesh Murti Aamchi Daan Tumchi nashik Lions club Social work News
या मूर्तींचे मूल्य खरेदी करणाऱ्या गणेश भक्ताने स्वतःच ठरवायचे असून, गुप्त पद्धतीने दान स्वरूपात दयायचे आहे. यातून मिळणाऱ्या रक्कमेचे सामाजिक कार्यासाठी वाटप केले जाणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात नाशिक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ग्रीन स्पेसेस, कृषी नगर येथे करण्यात आली आहे. यावेळी लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सचिव ला.राजू व्यास, ला. डी. एस. पिंगळे, ला. किरण चव्हाण, ला. सागर बोंडे, ला. विलास पाटील, ला. उमेश भदाणे, ला. रवींद्र दुसाने, आदी लायन उपस्थित होते. उपस्थित होते. या संकल्पनेसाठी किरण चव्हाण, सागर बोंडे, रवी अमृतकरयांचे आर्थिक पाठबळ लाभले आहे.Ganesh Murti Aamchi Daan Tumchi nashik Lions club Social work News
दरवर्षी पर्यावरण गणेश उत्सव साजर होतो. यात मूर्ती विसर्जनामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. यामध्ये अनेक प्रयोग केले जातात अनेक संस्था काम करतात. यावर उपाय म्हणून लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट तर्फे ‘श्री ची मूर्ती आमची दान तुमचे’ हा उपक्रम राबविला आहे. यामध्ये पेण येथील शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंगात (हळद,गुलाल,बुक्का,गेरू) रंगवलेल्या सुबक मूर्ती उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
गणेश भक्तांनी स्वतः मूर्ती पसंत करून तिचे मूल्य स्वतः ठरवायचे आहे. ते मूल्य लायन्स क्लब नाशिक, कॉर्पोरेटकडे गुप्तदान स्वरूपात द्यायचे आहे. सोबतच गणेश उत्सवा दरम्यान पूजा करतांना जे धान्य वापरले जाणार आहे, तेही एका वेगळ्या भांड्यात गोळा करायचे असून, विसर्जनाच्या दिवशी लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट हे स्वयंसेवक सर्व गोळा करणार आहेत. जमा झालेले सर्व धान्य स्वयंसेवी संस्था वितरीत केले जाणार आहे.Ganesh Murti Aamchi Daan Tumchi nashik Lions club Social work News
तर ज्यांना मूर्ती विसर्जित करावयाची आहे, त्यांच्यासाठी रामवाडी पूल, चोपडा लॉन्स जवळील संलन केंद्रात जमा करायच्या असून, लायन्स क्लब मूर्तींचे विधिवत विसर्जन करणार आहे.मिशन इन्होवेशन २०१८-१९ अंतर्गत “श्रीं”ची मूर्ती आमची दान तुमचे हा उपक्रम राबवत आहे. त्याबरोवर लायन्स क्लबचे सर्व सदस्य गणेश उत्सवा दरम्यान डीजे, लाऊडस्पीकर वापरणार नाही, सोबतच लहान आकाराच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती वापरणार आहेत.Ganesh Murti Aamchi Daan Tumchi nashik Lions club Social work News
“गणेश उत्सव आनंदाचा दिवस असतो. मात्र यात नदी आणि ध्वनी प्रदूषण होते. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे मी नागरिकांना आवाहन करतो. सण साजरा करतांना पर्यावरणाचा देखील विचार करावा. यासाठी मी स्वतः पुढाकार घेत ‘श्रींची मूर्ती आमची दान तुमचे’ या सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. गणेश भक्तांनाही याला साथ द्यावी”
– पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल.
“पर्यावरणपूरकतेचा विचार करतांना, गणेश मूर्ती महाग आहेत अशी ओरड होते. मग त्यावर उपाय म्हणून आम्ही “श्रीं”ची मूर्ती आमची दान तुमचे असा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे गणेश भक्तांना त्यांच्या आर्थिक शक्तीनुसार मूर्ती घरी नेता येणार असून, ते देत असलेली रक्कम आम्ही गुप्तदान स्वरुपात घेणार आहोत.त्यातून उभा राहणारी रक्कम आम्ही सामजिक कार्यासाठी वापरणार आहोत.”
– राजेंद्र वानखेडे , अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट