ylliX - Online Advertising Network

Ganesh Chaturthi 2022 जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी वाचा सविस्तर

Ganesh Chaturthi 2022 : दरवर्षी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. दरवर्षी या सणाची (Festival) गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात.

Ganesh Chaturthi 2022: संपूर्ण देशात गणेश उत्सव (Ganesh Utsav 2022) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा आणि भक्ती केली जाते तसेच त्यांना विविध प्रकारचे नैव्यद्य अर्पण केले जातात. गणेश चतुर्थीला गणपतींची स्थापना झाल्यानंतर 10 दिवस गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) उत्सव 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना (Ganpati Sthapana Muhurta) करतात. तुम्हीही या चतुर्थीला गणपती बाप्पाला घरात आणण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या बाप्पांच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त..

गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त (Ganesh Sthapana Shubh Muhurta)

गणेश चतुर्थी तिथी मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 03:34 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट बुधवारी दुपारी 03:23 वाजता समाप्त संपेल. यंदा गणपतींची स्थापना 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त 31 ऑगस्टला सकाळी 11:05 पासून सुरू होईल आणि 1 सप्टेंबर रोजी दुपारी 01.38 पर्यंत राहील.

गणेश मूर्ती स्थापना विधी (Ganesh Murti Sthapana Vidhi)

गणपतीच्या मू्र्तीची स्थापना करताना सर्वप्रथम चौरंगावर गंगाजल शिंपडा आणि ते शुद्ध करा. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्यावर अक्षता ठेवा. यानंतर श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर ठेवा. आता गणपतीला स्नान घाला आणि गंगाजल शिंपडा. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी स्वरूपात सुपारी ठेवा. गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवा. दुर्वा आणि फळं, फूलं अर्पण करा. हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाची आरती करा. त्यानंतर गणेशजींच्या ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा.

मूर्ती आणतांना लागणारे साहित्य
हळद, कुंकू,अक्षता,तबक किंवा ताट, तबकात ठेवण्यासाठी आसन, नविन रुमाल मोठ्या आकाराचा

मुर्ती घरी आणल्यावर लागणारे साहित्य
पाय धुण्यासाठी भांडभर पाणी,दूध, पोळीचा तुकडा, औक्षणाचे ताट (दोन तेलाचे दिवे, कुंकू,अक्षता, सोन्याची अंगठी, सुपारी)

यजमानाची तयारी

पितांबर किंवा सोवळं, उपरणे बसण्यासाठी आसन, पंचांग, हातरूमाल (पूजा करताना हात पुसायला), मुखवस्त्र (देव पुसण्यासाठी), पूजेचे पुस्तक, आरतीचे पुस्तक.

पूजेची पूर्वतयारी : –
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.

गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. यानंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करतात व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणतात.

या मंत्रांचा करा जप (Ganesh Chaturthi Mantra)

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात.
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश.

गणेश विसर्जन
अनंत चतुर्दशी शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी आहे. काही जण एक, काही दोन, काही तीन काही पाच तर काही संपूर्ण १० दिवसानंतर गणेशाचे विसर्जन करतात. विसर्जनावेळीही बाप्पांना निरोप देतांना यातल्याच साहित्याची गरज भासेल आणि गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी एक वस्त्र घ्या. त्यात मोदक, पैसा, दूर्वा आणि सुपारी बांधून घ्या. ते गणपती मूर्तीसोबत ठेवा. गणपतीची आरती करावी. या १० दिवसांत गणपतीची पूजा करताना आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी. त्यानंतर सम्‍मानपूर्वक गणपतीचं पाण्यात विसर्जन करावे.

anesh Sthapana 2022,Ganpati Sthapana Muhurta 2022,Ganpati Sthapana Shubh Muhurta 2022,Ganpati Sthapana Mantra,Ganesh Utsav 2022,Ganesh Chaturthi 2022

गणेश पूजनाचे संपूर्ण साहित्य, गणेश चतुर्थी, गणपती बप्पा, गणपती प्रतिष्ठापना, ganpati festival, ganpati bappa morya, ganpati bappa 2022, ganeshotsav, Ganesh Chaturthi Puja Samagri, ganesh chaturthi 2022 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.