ylliX - Online Advertising Network

मनपा आयुक्तांच्या निवास्थानावरून वाद : गमे Vs मुंढे, निर्णय सरकार दरबारी

शासकीय निवास्थान वाद गमे विरुद्ध मुंढे

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बदली होवून निघून गेले आहेत. मात्र त्यांच्या मागचे वाद काही कमी होतांना दिसून येत नाही. आता आयुक्तांच्या शासकीय निवास्थानावरून  वाद निर्माण झाला असून, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आयुक्त निवास्थान हवे या आशयाचे पत्र राज्याच्या प्रधान सचिवांकडे पाठवले आहे. मात्र तुकाराम मुंढे यांनी हे निवास्थान २०१९ पर्यंत राहू द्यावे अशी परवानगी घेतली    असून परिवार नाशिकला आहे तर सोबत मुलांच्या शाळा  सुरु शैक्षणिक वर्षा पुरते  निवास्थान कायम राहू द्यावे  अशी परवानगी घेतली आहे. मात्र ही परवानगी चुकीची असून  आयुक्त गमे यांनी नमूद केले आहे, त्यामुळे वाद निर्माण झाला   आहे.

Nashik News On Web Latest Updates Marathi Batmya 29 November Morcha support Nashik Wants Mundhe again तुकाराम मुंढे नाशिक आम्ही नाशिककर
तुकाराम मुंढे

आयुक्तपदाच्या नऊ महिने 13 दिवसांच्या कारकीर्दी संपली आणि  तुकाराम मुंढे यांची नोव्हेंबर 2018 मध्ये शासनाने मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली केली होती.  मुंढे मात्र येथे  रुजू झाले नाहीत. अर्थमंत्रालयाने मुंढे यांच्या नियुक्तीला विरोध केला होता अशी चर्चा आहे.  शासनाने मुंढे यांची  एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. मात्र, मुंढे मुंबईला गेले तरी त्यांची मुलांचे शिक्षण नाशिकच्या शाळेत सुरु आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब नाशिकमध्येच आहे.

राधाकृष्ण गमे

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या रिक्त मनपा आयुक्त पदी शासनाने नियुक्ती केली.  आयुक्तपदी गमे  रुजू झालें.  महापालिका आयुक्तांसाठीच्या निवासस्थान मिळावे म्हणुन त्यांनी प्रयत्न केले. मात्र मुलांच्या  शिक्षणामुळे मार्च 2019 पर्यंत आयुक्त निवासस्थानात राहू द्यावे, अशी विनंती मुंढे यांनी शासनाकडे केली होती, त्यांनी शासन निर्णयाचा आधार घेत राज्य  शासनाकडूनदेखील विनंती मान्य केली. मात्र  विद्यमान आयुक्त गमे यांनादेखील निवासस्थान हवे असल्याने त्यांनी प्रधान सचिवांकडे तक्रार केलीय.

शासनाने प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी नियमावली केली आहे. बदली झाली असली तरी मुलांच्या शिक्षणामुळे निवासस्थानाचा ताबा काही काळ ठेवता येतो. या  निर्णयाच्या  आधारे  मुंढे यांनी परवानगी घेतली असून तीमंजूर आहे.   परंतू, आयुक्त गमे यांनी मुंढे यांनी ज्या निर्णयाचा आधार घेतला आहे, तो निर्णय फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींनाच लागू होत असल्याचा दावा गमे  केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानावरुन दोन अधिकाऱ्यांत चांगलीच जुंपली आहे. आता या मागे कोणी राजकीय नेते आहेत की खरच हे दोघे अधिकारी भांडत आहेत अशी जोरदार चर्चा आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.