बॅडमिंटन : जीएबीएल स्पर्धेचे डॉल्फिन शटलर्स संघास विजेतेपद

नाशिक : गेले दोन दिवस रचना बॅडमिंटन हॉलमध्ये रंगलेल्या जीएबीएल अर्थात गोल्डन एज बॅडमिंटन लीगच्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद डॉल्फिन शटलर्स संघाने पटकावले. रविवारी (दि. 16) संध्याकाळी शेवटपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत डॉल्फिन शटलर्स संघाने हॉटशॉट्स संघाचा 4-3 असा पराभव केला. gabl season 2 2018 golden age badminton league dolphin shuttlers

रचना स्पोर्ट्स आणि कल्चर अकादमीतर्फे आणि डीए डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या पहिल्या दोन सामन्यात हॉटशॉट्स संघाला पराभव पत्करावे लागल्याने सामना एकतर्फी होण्याची शक्यता उपस्थितांनी वर्तवली. मात्र अर्जुन गुंडे आणि योगेश कोठारी तसेच मिश्र दुहेरीत जितेन ठाकरे आणि विद्या म्हात्रे यांनी आपापले सामने जिंकत लढतीत आपले आव्हान जिवंत ठेवले. हॉटशॉट्सच्या ज्ञानेश्वर इप्पर आणि शब्बीर ट्रंकवाला यांनी आपला सामना जिंकत संघाला आघाडी मिळवून देत विजयाची आशा निर्माण केली.

मात्र डॉल्फिन शटलर्सच्या डॉ. सुहास रहाणे आणि रमेश यांच्या आक्रमक खेळपुढे हॉटशॉट्सच्या अविनाश आपटे आणि मिलिंद देशपांडे यांचा निभाव लागला नाही आणि डॉल्फिनला बरोबरी साधता आली. अखेरच्या ‘करो या मरो’च्या लढतीतही डॉल्फिनच्या संभाजी पाटील आणि मेहमूद यांनी प्रशांत सराफ आणि जीनेंद्र शाह यांना पराभूत करत संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.

तत्पूर्वी राउंड रॉबिन लीग प्रकारात खेळताना सर्वच संघांनी पहिल्या दोन संघात स्थान मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नाशिक सुपर जायंट्स संघाचे 15 गुण असताना अंतिम सामन्यात खेळण्याची दावेदारी पक्की होती. मराठा वॉरिअर्स विरुद्ध खेळताना पाच सामने जिंकूनही ट्रम्प गुणांची कमाई करण्यास अपयश आल्याने त्यांचं एक गुण कमी झाला त्यामुळे 19 गुणांसह गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर त्यांना समाधान मानावे लागले.

तसेच नाशिक सुपर किंग्ज संघ तळाच्या स्थानी होता. अंतिम सामन्यात खेळण्याची कोणतीही अपेक्षा नसताना हॉटशॉट्स संघाला केवळ एक गुण मिळू देताना 20 गुणांवर रोखले त्यामुळे स्पर्धेतील चुरस आणखीनच वाढली होती. gabl season 2 2018 golden age badminton league dolphin shuttlers

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजेश पाथरकर, एम. एस. राणा, अतुल संगमनेरकर, अमित देशपांडे, मनोज शिंदे यांच्या संयोजन समितीने प्रयत्न केले.

असा होता अंतिम गुणतक्ता :

1. डॉल्फिन शटलर्स 23 गुण

2. हॉटशॉट्स 20 गुण

3. निवेक मास्टर्स आणि सुपर जायंट्स 19 गुण

4. नाशिक सुपर किंग्ज 17 गुण

5. मराठा वॉरिअर्स 16 गुण

gabl season 2 2018 golden age badminton league dolphin shuttlers
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.