नाशिक :सिन्नर येथील भूमिपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जवान राजेश किरण केकाण व पत्नी शोभा यांच्यावर आज शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सीआयएसएफच्या जवानाने आपल्या पत्नीसह सहकारी जवान आणि त्याची पत्नी अशा तिघांची १६ गोळ्या झाडून हत्या केली होती. हा सर्व प्रकार जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे घडला आहे.
या घटनेतील जम्मु-काश्मीर येथुन शनिवार सकाळी ८ वाजता केकाण पती-पत्नीचे पार्थिव चिंचोली येथे लष्कराने आणले होते. यामध्ये गावातील व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या प्रागंणात राजेश यांचे लहान बंधु जवान गणेश व मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला आहे.
यावेळी त्यांना सी.आय.एस.एफ च्या जवानांनी राजेश केकाण यांना मानवंदना दिली. हजारो ग्रामस्थ व नातेवाईकांनी जवानाच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे,जिल्हा परिषद सदस्य सुनिता सानप,तहसिलदार नितीन गवळी उपस्थित होते. सीआयएसएफचे धर्मपाल सोमकुमार व बीपीन कुमार आदींनी केकाण पती-पत्नीला श्रध्दांजली वाहिली.
काय आहे पूर्ण प्रकरण :
सीआयएसएफ काश्मिर येथे नाशिकच्या जवानाची पत्नीसह हत्या
जवानाने केली स्वतःच्या बायको सह केली नाशिकच्या सहकारी त्यांच्या पत्नीची गोळी झाडून हत्या
नाशिक : एक दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. सीआयएसएफ जवानाने त्याच्या बायकोसह सोबतचे मित्र नाशिक (सिन्नर) येथील जवान आणि त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. या मध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सैनिकात आणि नागरिकांत खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सीआयएसएफच्या जवानाने आपल्या पत्नीसह सहकारी जवान आणि त्याची पत्नी अशा तिघांची १६ गोळ्या झाडून हत्या केल्याचे उघड झाले. हा सर्व प्रकार जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे घडला आहे.
यामधील मृत जवान आणि त्याची पत्नी सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. हा प्रकार विवाहबाह्य संबंधामुळे झाल्याचा संशय व्यक्त प्राथमिक तपासात उघड झाला आहे.

यामध्ये आपल्या नाशिकचे जवान राजेश किरण केकाणे त्याची पत्नी शोभा सोबत किश्तवाडमध्ये राहत होते.त्या ठिकाणी ते तैनात सुद्धा होते. तर धुलस्ती राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी राजेश तैनात होवून काम करत होते. तर हत्या करणारा जवान तेलंगणा येथील रहिवासी इंगलप्पा सुरिंदर असून तो जवान राजेशचा मित्र होता.
सुरिंदर सीआयएसएफच्या शालिमार चौकातील कॉलनीमध्ये राहत होता. तो गुरुवारी दुपारी अचानपणे त्याने त्याची पत्नी लावण्य हिच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. तो तडक लगेच राजेशच्या घरी गेला . सुरिंदर याने पोहोचताच राजेशसह त्याची पत्नी शोभा यांच्यावर जबर गोळीबार केला.
यात केकाणे दाम्पत्य आणि सुरिंदरची पत्नी या तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरिंदरला अटक केली. यामध्ये लगेच दोन्ही कुटुंबीयांच्या चारही मुलांची जबाबदारी सीआयएसएफने घेतली आहे. आरोपी सुरिंदरला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले आहे.
राजेश व शोभा यांच्या पार्थिवावर चिंचोलीच्या व्ही. एन. नाईक हायस्कूलच्या पटांगणावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. राजेश २००९ मध्ये सीआयएसएफमध्ये कामास सुरुवात केली. राजेश आणि शोभा यांच्या मागे दीड वर्षाची मुलगी आणि आर्यन हा साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणाने सर्व हादरून गेले आहेत. त्यामुळे नाशिकवर शोककळा पसरली आहे.