Free vaccination Maharashtra महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

राज्यात सर्वाधिक कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार (State Government) ने लॉकडाऊन लागू केला. त्याचबरोबर सरकारने लसीकरणांची संख्या देखील वाढवली. आता राज्य सरकारने मोठी घोषणा कोरोनाच्या बाबतीत केली आहे. वय १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण (vaccination) केलं जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. Free vaccination Maharashtra

राज्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. त्यात लसीकरणांचा वाढवलेला आकडा त्यानंतर मोफत लसीकरण हे सरकारचे महत्त्वाचे निर्णय ठरणार आहेत. इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य केंद्रीत केले असून, १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. मात्र १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर त्यावर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना निर्णयाची घोषणा केली. मलिक म्हणाले,”केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे वय वर्ष ४५ खालील लोकांना केंद्र लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे. कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.

“महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून, जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. मागच्या कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली. यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.Free vaccination Maharashtra

Joining the ranks of states like Uttar Pradesh, West Bengal, and Uttarakhand, the Maharashtra government on Sunday said it will provide free vaccination to all persons above 18 years of age in the state and a global tender will be issued to make the vaccine available at cheaper rates, Nawab Malik, cabinet minister, government of Maharashtra said in a social media post.  "For this, the programme will be undertaken from the treasury of the state government," said Malik.

Joining the ranks of states like Uttar Pradesh, West Bengal, and Uttarakhand, the Maharashtra government on Sunday said it will provide free vaccination to all persons above 18 years of age in the state and a global tender will be issued to make the vaccine available at cheaper rates, Nawab Malik, cabinet minister, government of Maharashtra said in a social media post.

“For this, the programme will be undertaken from the treasury of the state government,” said Malik.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.