ylliX - Online Advertising Network

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देणार मोफत शिक्षणाचे धडे

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देणार मोफत शिक्षणाचे धडे शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी गरज – कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांचे प्रतिपादन

 नाशिक :  समाजाचा शैक्षणिकदृष्टया विकास साधण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कार्य गेल्या २८ वर्षांपासून ज्ञानदानाचे यशस्वीपणे करीत आहे. विविध शिक्षणक्रम विकसित करून या विद्यापीठाने समाजाला जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम हे विद्यापीठ करीत आहे. यापुढील काळात तळागाळातील सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी सर्वांच्याच पुढाकाराची गरज असून या उपक्रमात प्रत्येकाने आपला सहभाग देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास कक्षाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन. समोर उपस्थित विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी.

विद्यापीठात दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या महिला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत महिला कर्मचारी रेखा अहिरे यांच्या हस्ते काल मुक्त विद्यापीठाच्या आवारात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास कक्षाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे, निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे, कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ व्यासपीठावर होते.

नवीन संकेतस्थळ

कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, ज्ञानदानाची चळवळ विद्यापीठ राज्यभर चालवीत असले तरी मुख्यालयात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देखील शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक विकास साधण्याची गरज निर्माण झाली होती. म्हणूनच या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ मुख्यालयात सुरु केलेल्या या अभ्यास केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गेली वर्षानुवर्षे विद्यापीठात राबणाऱ्या ३० चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांना पदवी शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञानाचे शिक्षणही देण्याचा आपला निर्धार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठाच्या पीएच. डी. विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग दिला असल्याचे सांगून यातून अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यास मदत असा विश्वासही कुलगुरू वायुनंदन यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

विद्यापीठाच्या सेवा सुविधा विभागाचे प्रमुख सुनील बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रभारी जनसंपर्क प्रमुख संतोष साबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध विद्याशाखांचे संचालक, प्रमुख, अधिकारी, दैनंदिन कर्मचारी, सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.