माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनामित्त आयोजित कार्यक्रमात पुस्तक पेटीचे वाटप
शाळेतील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी, लहान मुलामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती टिकून ठेवण्यासाठी शहरातील हेल्पींग ऑपरेस्ड पिपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन अर्थात होप फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ‘माझे ग्रंथालय’ या उपक्रम राबविला जात. यात जिल्ह्यातील गोर-गरीब अादीवासी विद्यालय, जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेत शंभर विविध पुस्कांची क्षमता असलेली पुस्तक पेटी भेट दिली जातात. माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनामित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने या पुस्तक पेटीला ‘डॉ.कलाम स्टडी बॉक्स’ असे नाव देण्यात आले.
गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारे मदत करणारी हेल्पींग ऑपरेस्ड पिपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन अर्थात होप फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने अाता आगळी वेगळी संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे.‘माझे ग्रंथालय’ या उपक्रमा अंतगृत शहरातील महापालिकेच्या शाळेत पुस्तक पेटींची भेट दिली जात आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची होणारी घसरण लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून होप फाउंडेशनने शाळेमध्ये ‘माझे ग्रंथालय’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यातून इंग्रेजी,उर्दू,हिंदी व मराठीतील समफद्ध साहित्याचा परिचय व्हावा यासाठी ‘पुस्तक तुमच्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. शहरातील महापालिकेच्या शाळेत शंभर विविध पुस्कांची क्षमता असलेली पुस्तक पेटी भेट देण्यात आली आहे.
या पेटीत इंग्रेजी,मराठी, हिंदी व उर्दू भाषेतील विविध प्रकारचे शंभर वेगवेगळे पुस्तक उपलब्ध करुन देण्यात आलेले अाहे. गुरुवारी(दि.२७) माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनामित्त जुन्या नाशकात आयोजित कार्यक्रमात या पुस्तक पेटीला ‘डॉ.कलाम स्टडी बॉक्स’ असे नाव देण्यात आले.
यावेळी होप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.नुर-ए-ईलाही शाह, होप मेडीकल व्हींगचे अध्यक्ष डॉ.दिलशाद बेग, होप महिला व्हींगच्या अध्यक्षा डॉ.जश्मिन बेग, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष अँड.मजहर शेख, सचिव जहीर आर. शेख, खजिनदार मोहसीन खान, सहसचिव ईसाक कुरेशी, मोबीन पठाण, रियाज बाबु, खुर्रम बेग, अँड.आसिम शेख, शिरीन सय्यद, अँड.वसीम शेख,शाहेस्ता काझी, अँड.योगेश मोरे, निखत शेख आदी उपस्थित होते.