माजी खासदार राजभाऊ गोडसे यांचे निधन

नाशिक : शिवसेनेचे नाशिकचे माजी  खासदार राजाभाऊ पराशराम गोडसे यांचे आज  उपचार सुरू असताना येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांचे वय 56 वर्षे होते.राजाभाऊ गोडसे हे शिवसेनेतर्फे लोकसभेवर निवडून आले होते त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते.Former MP Rajbhau Godse passes away nashik today evening

त्यांची अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती, त्यामुळे त्यांनाखासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला. राजाभाऊ यांनी शिवसेनेसोबत आपले राजकीय काम सुरु केले. त्यांनी  देवळाली कॅम्प शिवसेना, शहरप्रमुख, संसारी ग्रामपंचायत सरपंच, 12 वर्ष शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य एकलहरे गट तसेच खासदार असताना मंत्रालयात प्रमुख पद सांभाळले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राजाभाऊ गोडसे.

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे पार्थिव देवळाली हॉस्पिटल, लॅमरोड, बेलतगव्हाण फाटा, देवळाली कॅम्प या ठिकाणी ठेवण्यात आले असून, उद्या दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दारणातीरावर, संसरी गाव, नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली.
Former MP Rajbhau Godse passes away nashik today evening
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.