ylliX - Online Advertising Network

Gurmeet Bagga नाशिकचे माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

नाशिक : आपल्या अभ्यासू मुद्द्यानी प्रत्येक महासभा गाजवणारे अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांकडे आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. मात्र बग्गा यांच्या गळ्यात काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष म्हणूंन माळ पडणार असल्याने नाशिक महापालिकेत आगामी निवडणुकात काँग्रेसला अच्छे दिन येतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काँग्रेस प्रदेशाधक्ष्य पदाची सूत्रे नाना पटोले यांनी हाती घेतल्यापासून नाशिकची भाकरी फिरणार असल्याची चर्चा रंगत होती. प्रवेश अनेकवेळा निश्चित झाल्याचीही चर्चा झाली मात्र पक्ष अंतर्गतच एकमत होत नसल्याने हा प्रवेश लांबल्याची सूत्रांची माहिती आहे. महापालिका निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपल्याने आता भाकरी फिरवली तरच आगामी काळात काँग्रेसचे बोटावर मोजण्याइतपत असलेले नगरसेवक वाढतील हे गृहीत धरून संघटनात्मक बदल गरजेचेच आहेत असे काही जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.Former Deputy Mayor of Nashik Gurmeet Bagga resigns

अनेक महिन्यांपासून नाशिकमधील कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद रिक्त आहे. बग्गा यांची या जागी नियुक्ती होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी, भाजप आगामी महापालिकेची तयारी करत असतानाच आता वाली नसलेल्या कॉंग्रेसला धडाकेबाज, स्पष्ट वक्ता असलेल्या गुरमित बग्गा यांच्या रूपाने शहराध्यक्ष मिळाला तर अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
तसेच महानगरपालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने बग्गा यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी ठरले. त्यानंतर पुन्हा २०१७ च्या निवडणुकीतही ते अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, आता २०२३ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे सध्याचे नगरसेवक पद कायम ठेवून त्यांना पक्षप्रवेश करणे शक्य नसल्याने, त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केला. हा राजीनामा थेट आयुक्तांना सादर झाल्याने तो मंजुरही झाला आहे.काँग्रेस पक्षाकडूनच सर्वसामान्य माणसाला अपेक्षा आहेत. पक्षाला बळकटी देण्याची गरज आहे. दीड महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला होता. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे.Gurmeet Bagga

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.