autopsy देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन

ऑनलाईन टीम / :

कोरोना रुग्णांवर संशोधन करण्यासाठी देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या शवविच्छेदन अहवालातून संशोधनासाठी महत्वाची माहिती समोर येणार आहे.भोपाळच्या AIIMS ने या शवविच्छेदनासाठी ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ची परवानगी घेतली होती. या परवानगीनंतरच डॉक्टरांच्या एका टीमने पीपीई किटसह सुरक्षितरित्या कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. आणखी काही मृतदेहांचे शवविच्छेदन करून त्याचा एकत्रित अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. autopsy

मृत शरीरात कोरोना विषाणू किती काळ जिवंत राहतो, शरीरातील अवयवांना तो कशा प्रकारे हानी पोचवतो, तसेच त्याचा शरीरात किती प्रभाव राहू शकतो, यासारखी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.देशात पहिल्यांदा मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एम्स (AIIMS) कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. कोरोनाचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. आतापर्यंत परदेशात झालेल्या संशोधनावर कोरोनाबाधितांवर उपचार केले जात होते. 

भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) कडून परवानगी मिळाल्यानंतर भोपाळमधील AIIMS ने केलेल्या संशोधनात संक्रमित मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. संशोधनात भोपाळमधील AIIMS मध्ये जवळपास १० कोरोनाबाधित मृतदेहांचे पोस्टमार्टम केले आहे. परदेशात झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे की, कोरोना संक्रमित रुग्णांच्या हृदयावर, मेंदूवर आणि फुफ्फुसावर परिणाम होतो. भारतात कोरोनाबाधितांच्या शरीरावर या व्हायरसचा परिणाम काय होतो याबाबत काहीच कल्पना नाही. याकरता संशोधन करण जास्त गरजेचं आहे. 

भोपाळमधील AIIMS च्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, AIIMS च्या प्रमुख कमिटीने कोरोना संक्रमित मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यास अनुमती दिली आहे. आतापर्यंत ही माहिती समोर आलेली नाही की, कोरोनामुळे रुग्णाच्या कोणत्या शरीराच्या अवयवावर परिणाम होतो याची माहिती मिळाली आहे. या संशोधनानंतर डॉक्टरांना माहिती मिळेल की, कोरोनाचा शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम होतो. autopsy

या संशोधनामुळे कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. जोपर्यंत व्हॅक्सीन मिळत नाही तोपर्यंत यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. रुग्णांच्या शरीरातील अवयव निकामी होण्यापासून रोखण्यास मदत केली पाहिजे. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.