ylliX - Online Advertising Network

जग प्रसिद्ध असलेले फाईव्ह स्टार JW Marriott Hotel/Courtyard नाशिकच्या सेवेत !

जग प्रसिद्ध असलेले फाईव्ह स्टार JW Marriott Hotel चे Courtyard by Marriott: Business Hotel   नाशिकच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे या हॉटेलच्या शाखा आहेत. तर जगात अनेक देशात या हॉटेलच्या शाखा आहेत. राज्यातील बदलेते आणि सुंदर शहर म्हणून असलेले आपले नाशिकच्या सेवेत हे   हॉटेल दाखल होणार  आहे. हे  तारांकित हॉटेल    असून  उच्च दर्जाच्या जागतिक सेवा  हॉटेलमार्फत उपलब्ध करवून देण्यात  येणार आहे.  या हॉटेलची बिजनेस विंग अर्थात शाखा म्हणजेच Courtyard by Marriott: Business Hotel हे  हॉटेल  सेवेत दाखल  होत आहे.

प्रथितयश बांधकाम व्यवसायिक, उद्योगपती हे हॉटेल सांभाळणार या हॉटेल मुळे आपल्या नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल , सोबतच पर्यटन करत असलेले अनेकांना या हॉटेलचा फायदा होणार असून, नाशिकमध्ये रोजगार वाढून इतर अनेक उद्योगांना फायदा होणार आहे.

या हॉटेलचे बांधकाम जोरात सुरु असून हे हॉटेल व्होकहार्ट हॉस्पिटलच्या रांगेत असणार आहे. त्यामुळे द्वारका परिसराला मोठे महत्व प्राप्त होणार आहे. शहरातील असलेले ताज हॉटेल, एक्स्प्रेस इन यांना मोठे आवाहन आणि स्पर्धा निर्माण झाली आहे. या वर्षीच्या दिवाळी नंतर हे हॉटेल पूर्णपणे आपली सेवा सुरु करणार आहे.

( या आगोदर अनवधानाने मुख्य हॉटेलचाच पोस्ट मध्ये उल्लेख होता. मात्र ती चूक सुधारत आम्ही Courtyard by Marriott: Business Hotel  चा उल्लेख केला आहे. या चुकीबाबत आम्ही दिलगीर आहोत. वाचकांनी याची नोंद घ्यावी.)

खालील फोटो हे हॉटेलच्या इतर ठिकाणाची आहेत. फोटो : गुगल 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.