मुंबईमधील गोरेगाव येथून साईंची पालखी घेऊन जाणाऱ्या एका साई भक्तावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्डीजवळील सावळीविहीर येथे हा गोळीबार झाला असनू निलेश पवार साईभक्त बचावला आहे. पूर्ववैमनस्यातून (Animosity Firing in Shirdi) गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. जखमीवर शिर्डीतील साईबाबा हाॅस्पीटलमध्ये (Shirdi Sawali Vihir Firing) उपचार सुरू असून गोळीबार करणाऱ्या आरोपी तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Firing at Sai Palkhi in Mumbai near Shirdi Nilesh Pawar latest marathi crime news)
विकी भांगे (वय, ३० रा.पुसद, यवतमाळ) असे गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर निलेश सुधाकर पवार ( वय, २७ पुसद हल्ली मुक्काम, गोरेगाव मुंबई) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील गोरेगाव येथून साईबाबांची पालखी शिर्डीच्या दिशेने निघाली होती. याच पालखीमध्ये विकी भांगे आणि सुधाकर पवार सहभागी झाले होते. मागिल राग मनात धरून भांगे याने पालखी शिर्डीमध्ये पोहोचल्यानंतर पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये निलेश पवार हा जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डीमधील साईबाबा रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबार करणाऱ्या भांगे या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
गोळीबार करणारा आरोही हा निलेश पवार याचा मेहुणा असल्याचं समजत आहे. दोन वर्षांआधी निलेशने आरोपीच्या बहिणीसोबत पळून जात लग्न केलं होतं. याचाच राग मनात धरत आरोपीने निलेशवर गोळीबार केल्याचं बोललं जात आहे. Firing at Sai Palkhi
बहिणी सोबत लग्न केल्याच्या रागातून गोळीबार
गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वैयक्तिक कारणातून
हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
जखमी निलेश याने भांगे याच्या बहिणीसोबत दोन वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते.
याचाच राग असल्याने गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे शिर्डीत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.