कापड मिलला भीषण आग मात्र जीवितहानी नाही Fire at Cotton Mill

आज दुपारची घटना

नाशिक : दिपाली नगर परिसरात कापड रिसायकल कारखान्याला दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग कारखान्यात शॉर्टसर्किट मुळे लागली होती. हा कारखाना अब्बास अशरफ अली यांच्या मालकीचा आहे. cotton mill fire caught deepali nager nashik

शॉर्टसर्किट होऊन सव्वा दोन वाजताच्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले होते. महापालिका अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी पोहचले होते. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली आहे.

कारखाना जळाला त्यात आर्थिक नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. जुने कपडे घेऊन त्याद्वारे इलेक्ट्रिक यंत्रातून भुगा करून गाद्या येथे बनविल्या जात होत्या.

cotton mill fire caught deepali nager nashik

nashikonweb

Like Us On Facebook

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.