FATHER SON बसण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी : बापलेकाचा खुन

निफाड : तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील अंबिका नगर परिसरात घराजवळ बसण्यावरून दोन गटामध्ये झालेल्या किरकोळ वादातून प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या बापलेकांचा गुरुवार (दि.३) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पिंपळगाव बसवंत शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करत आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. FATHER SON

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील अंबिका नगर परिसरात गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी चारच्या दरम्यान घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे व धाडीवाल या कुटुंबाचे दोन गटात वाद निर्माण झाले. त्यातील धाडीवाल गटाकडून शिंदे कुटुंबातील बाप लेकावर धारदार शस्त्रणे प्राणघातक हल्ला केला. यात पुंडलिक गंगाराम शिंदे (६७ ) व माणिक पुंडलिक शिंदे ( ४० ) रा. अंबिका नगर हे दोघे या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना गुरुवार (दि.३) रोजी या दोघांचा मृत्यू झाल्याने शहरात मात्र खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंबिकानगर परिसरात गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी चारच्या दरम्यान घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे व धाडीवाल या दोन गटात वाद झाला. त्यातील धाडीवाल गटाकडून शिंदे कुटुंबातील दोघा बाप-लेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात पुंडलिक गंगाराम शिंदे (वय ६७) व माणिक पुंडलिक शिंदे (वय 40, रा. अंबिकानगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी उपचार सुरू असताना या बाप-लेकांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेबाबत पिंपळगाव पोलीस स्थानकात विकी दत्तात्रय धाडीवाल (२७) व अजय प्रकाश धाडीवाल (१९) रा.अंबिका नगर पिंपळगाव बसवंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत गजाआड करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे करत आहे. FATHER SON

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.