नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये मारहाण झाल्याची समोर आली आहे. यामध्ये दर्शन घेण्याच्या कारणावरून भविकांची सुरक्षारक्षकात वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दोन ते तीन भाविकांसह सुरक्षारक्षकही जखमी झाले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात मारहाण करणारा भाविक लष्करी जवान आहे. या जवानाने त्याने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात हेल्मेट घातला. त्यामुळे सुरक्षारक्षक रक्तबंबाळ झाला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत भाविक असलेला लष्करी जवानही जखमी झाला. दरम्यान, सुरक्षारक्षकाला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवलं आहे. राजस्थान येथील भाविक सुनीलकुमार नेमीचंद जानू वय २८ फौजी हे आपल्या आई वडिलासोबत आज त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. यामध्ये शिपाई योगेश गमे डोक्यात हेल्मेट मारल्याने जखमी झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत विनय हर्दीया या भाविकाचा सुद्धा वाद झाला असून दोन्ही प्रकरणात एकमेकांविरोधात पोलीस केस केली आहे.
Naaaaraaayaaan, naaaraaaayaaan