ylliX - Online Advertising Network

Female Friend मैत्रिणीसोबत जवळीक , नाशिकच्या युवकाकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत नामक मुलगा नवी मुंबईतील तळवली भागामध्ये राहत होता. या दरम्यान अनिकेतची एका मुलीशी ओळख झाली होती. त्यांच्यात बोलणं देखील सुरु झालं. मात्र मध्यंतरी कोरोना आला आणि अनिकेत आपल्या घरी नाशिकला राहायला गेला. (Nashik Youth kills Man for friendship with Female Friend)

या काळात अनिकेतच्या ओळखीच्या अनिल शिंदे याची त्याच मैत्रिणीशी ओळख झाली. लॉकडाऊनच्या काळात अनिलची अनिकेतच्या मैत्रिणीशी ओळख वाढत होती. दोघांमधील जवळीक वाढत होती. अनिल आणि त्या मैत्रिणीची वाढलेली जवळीक अनिकेतला खटकत होती.शेवटची राग अनावर न झाल्याने अनिकेतने टोकाचं पाऊल उचललं आणि अनिलचा थंड डोक्याने कोयत्याने हल्ला करत खून केलाय.

बेपत्ता तरुणाचा शोध घेताना हत्येचा सुगावा

नवी मुंबईतील तळवली परिसरात राहणारा 19 वर्षांचा अनिल शिंदे पाच फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे लोकेशन शोधलं असता नाशकातील तरुणाची माहिती समोर आली.

पोलिसांनी 19 वर्षांच्या अनिकेत जाधवला नाशिकमधून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या घटनास्थळावरुन अनिलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

घणसोली गावालगतच्या झाडीत हा मृतदेह टाकला होता. चार दिवसांपासून अनिलचा मृतदेह पडून होता. अनिकेतची मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

nashiki muirder

नेमकं काय घडलं?

19 वर्षांचा आरोपी अनिकेत जाधव हा पूर्वी नवी मुंबईतील तळवली परिसरात राहत होता. त्यावेळी एका तरुणीसोबत त्याची मैत्री होती. परंतु लॉकडाऊनच्या काळात तो गावी गेला आणि दोघांमध्ये अंतर निर्माण झालं.

दरम्यानच्या काळात मयत तरुण अनिल शिंदेची त्या मुलीसोबत मैत्री झाली. दोघांमधील वाढती जवळीक अनिकेतच्या डोळ्यात सलत होती. त्याने आपल्या मित्रासह नवी मुंबईला येऊन अनिलचा काटा काढायचं ठरवलं. घणसोलीत येऊन त्यांनी एका व्यक्तीच्या मोबाइलवरून अनिलशी संपर्क साधला. भेटून त्याला दारु पाजल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या केली होती. 

समोर येणाऱ्या माहितीनुसार अनिकेतला या हत्येत एका अल्पवयीन मुलाने देखील मदत केली. पोलिसांनी अनिकेत आणि त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय. अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.  

अनिकेत जाधवने अनिल शिंदेचा खून केल्याचं पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात कबूल केलं आहे. Female Friend

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.