ylliX - Online Advertising Network

बापाने केला चिमुरडीवर दारू पिऊन अत्याचार आणि खून

दिंडोरी तालुक्यात एक माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. बापानेच दारूच्या नशेत चिमुरडीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. यात घृणास्पद म्हणजेच त्या नराधमाच्या आईने म्हणजेच चिमुरडीच्या आजीने हा प्रकार लपविण्याचा प्रकार केला आहे. पोलिसांना संशय निर्माण झाला आणि हे प्रकरण उघड झाले आहे.

जऊळके वणी येथे ५  वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये आरोपी पिता सचिन शिंदे वय २५ याने रात्री स्वतःच्या चार वर्षीय मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केले आणि तिचा गळा दाबून खून केला आहे. हे प्रकरण उघड होवू नये म्हणून त्याची आणि अनुसया शिंदे हीने प्रकरण लपवण्यासाठी मदत केली होती.त्यांनी या मुलीचे जिल्हा परिषद शाळेजवळ तिचे मृत शरिर या दोघांनी टाकून दिले होते. नंतर घटना घडलीच नाही असा बनाव केला आणि पोलिस स्टेशनला मुलगी हरवली अशी फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले आणि लगेच तपास सुरु केला.घटना स्थळी श्वान पथक बोलवले गेले. तर तपास सुरु केला.

सर्व शक्यता या बापाकडे बोट दाखवत होत्या.पोलिसांनी योग्य प्रकारे विचारणा केली असता त्यांच्या जबाबात फरक दिसून आला होता. तर मुलीची मृत शरिर टाकताना एकाने पाहिलं होत. पोलिस तपासात बापानेच खून केला हे उघड झाले आहे. मुलीची आईने वर्षापूर्वीच घर सोडले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.यातील आरोपी हा मोलमजुरी करणारा आहे.

मुलीचे मृत शरीर मिळताच या भागात तणाव निर्माण झाला होता. गावकरी संतापले होते. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.