गांजा व्यसनी मुलाने केला वडिलांचा खून, न्यायालयाने सुनावली जन्मठेप

नाशिक : धक्कादायक प्रकार सिडको परिसरात घडला असून, यामध्ये गांजाचे व्यसन असलेल्या मुलाने वडिलांचा खून केला होता. या प्रकरणी कोर्टाने यावर कठोर निर्णय देत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून त्यांचा खून केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी. देशमुख यांनी बुधवारी (दि.५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी जॉनी मधुकर बोरगे (२८,अजिंक्य व्हीला, शिवशक्ती नगर, सिडको) नाव आहे. सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी या खटल्यात पाहिले असून त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे.  father killed by son court sentenced to life nashik on web

नवीन नाशिक अर्थात सिडको परिसरातील शिवशक्तीनगरमध्ये मधुकर तुकाराम बोरगे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. मुलगा जॉनी मधुकर बोरगे यास गांजाचे व्यसन होते. त्यातून तो नेहमी आई-वडिलांना शिवीगाळ करीत असे त्यामुळे घरात अनेकदा भांडणे देखील होत असता. वडील मधुकर हे 29 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजता घराच्या ओट्यावर खुर्ची टाकून बसले होते. यावेळी त्यांचा मुलगा जॉनी याने लाथ मारून वडिलांना खाली पाडत, लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला केला. यात घाव वर्मी लागला आणि वडिलांचा मृत्यू झाला. अंबड पोलिसांनी घटनेची नोंद करत आरोपीस पकडले. father killed by son court sentenced to life nashik on web

तुम्हाला नाशिकच्या बातम्या हव्यात त्या सुद्धा खऱ्या आणि शहानिशा केलेल्या तर मग आमच्या Whats App ग्रुप मद्ये सहभागी व्हा लिंक कीलक करा… … धार्मिक, महापुरुष, जातीवादी किंवा कोणताही फोरवर्ड मेसेज केला तर रिमूव करू हे लक्षात असू द्या 

https://chat.whatsapp.com/EyMRaIOjogmEmPRu4rudvK

एपीआय शिवाजी आहिरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश जीपी देशमुख यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी महत्त्वाचे असे सात साक्षीदार तपासले होते . न्यायाधीश देशमुख यांनी आरोपी बोरगे यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

father killed by son court sentenced to life nashik on web
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.