शेतकरी संप यशस्वी करणार, शेतकऱ्यांचा निर्धार

 नाशिक : येत्या 1 जून ते 10 जून दरम्यान होणाऱ्या शेतकरी संपात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होवून शेतकरी संप यशस्वी करण्याचा एकमुखी निर्णय गिरणारेयेथे झालेल्या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी केला.शेतकरी आपल्या घरावर काळे झेंडे लावून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला आहे.

नाशिक तालुका शेतकरी संप संयोजन समितिच्या वतीने येत्या 1 जून ते 10 जून 2017 रोजी होणाऱ्या “शेतकरी संप”यशस्वी करण्यासाठी गिरणारे येथील गणपति मंदिरात शेतकरी सभा घेण्यात आली. याप्रसंगी तमाम शेतकरी बान्धव यांना आपापल्या घरावर संप काळात काले झेंडे लावणे, गावागावात शेतवस्तिवर पत्रके वाटने, फ्लेक्स बोर्ड लावणे ,मोटार सायकल रैली काढ़ने, गाव परिसरात शेतीमाल विक्री 100 टक्के बंद ठेवणे, बाहेरून येणारा शेतीमाल विक्री ला प्रतिबन्ध करणे ,  दूध हॉस्पिटल व शाळेत वाटने, भाजीपाला विक्रिला 100 टक्के प्रतिबन्ध करन्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी लग्न कार्यातील,हळद कार्यक्रमातील जेवनावळी, लग्नातील टोपी फेटे बंदी, ,साखरपुढे,बस्ते घरघुती  साधे पद्धतिने करण्याचा ठराव करण्यात आला, यावेळी अत्यंत शांततेने शेतकरी संप यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला,यावेळी शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या अडचणी अत्यंत खुल्या मनाने मांडल्या, व् संताप व्यक्त केला. संपात सहभागी होवून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी गट्तट सोडून एकत्र येणार असल्याचे सांगितले, शेतकरी संपात फुट पाडणारे  शेतकरी द्रोही ठरतील असा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी जर संपावर गेले तर मोठे संकट निर्माण होणार आहे. सरकार प्रत्येक गोष्टीत चाल ढकल करत असून जर आताही तसे केल्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत.

यावेळी शेतकरी संप नियोजन बैठकीत पुण्डलिकराव थेटे,निव्रुत्ति घुले,तालुका संघाचे बालासाहेब हांडोरे,शिवसेना नेते परसराम गायकर,भिकाभावु थेटे, लुखाभाऊ थेटे,काशीनाथ थेटे,विजय थेटे,बालासाहेब कसबे,दगु नाना थेटे,अक्षय कातड,नितिन गायकर,ज्ञानेश्वर वाघ,

भाऊसाहेब म्हैसधुने, महेंद्र थेटे,अनिल थेटे,शाम गायकर शेतकरी वाचवा अभियानचे निमंत्रक राम खुर्दळ,पत्रकार ज्ञानेश उगले,तानाजी गायकर,लहानु थेटे यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते,प्रास्ताविक राम खुर्दळ यांनी आभार अनिल थेटे यांनी मानले.
किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी पिंपळगाव येथील शेतकरी रँली नंतर १ जुन पासुन शेतकरी संपावर जाणार असल्याची माहिती मार्केटमधे शेतकरी बांधवांना दिली. यावेळी हजारो शेतकरी हजर शेतकऱ्यांचा संपावर जाण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.