ylliX - Online Advertising Network

किसान सभेच्या लॉंग मार्चला दुसऱ्या दिवशीही जोरदार प्रतिसाद 

सामील होणाऱ्या शेतकऱ्यांचा ओघ वाढलाFarmers Long March nashik mumbai second day many farmers Joining 

शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी काल दिनांक 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेला लॉंग मार्च आज दुसऱ्या दिवशी इगतपुरी तालुक्यात दाखल झाला. दुसऱ्या दिवशी इगतपुरी तालुक्यातील शेतकरी लॉंग मार्च मध्ये सामील झाल्याने नाशिक येथून सामील झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. नाशिक येथून निघालेल्या लॉंग मार्च चे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गावांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत होत आहे. गावोगावचे शेतकरी लॉंग मार्च मधील शेतकऱ्यांना पाणी पुरवून व फुले देऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.Farmers Long March nashik mumbai second day many farmers Joining 

लॉंग मार्च मध्ये सामील झालेल्या शेतकऱयांनी आपल्या गावातून तांदूळ व शिधा सोबत आणला आहे. काल रात्री रायगड नगर येथील वालदेवी नदी जवळ लॉंग मार्च ने मुक्काम ठोकला होता. सोबत आणलेल्या भाकरी शेतकऱयांनी येथे आपसात वाटून खाल्ल्या. किमान 30 हजार शेतकऱयांनी रोडवर व आजूबाजूच्या शेतात झोपून मुक्कामाची पहिली रात्र काढली. सकाळी पुन्हा 18 किलोमीटर अंतर पायी चालून लॉंग मार्च खंबाळे ता. इगतपुरी येथे पोहचला. येथील तळ्यावर आपल्या बरोबर आणलेला तांदूळ उकडून शेतकऱयांनी भोजन केले. दुपारी 3 वाजता लॉंग मार्च पुन्हा सुरु झाला. रात्री घाटनदेवी ता. इगतपुरी येथे लॉंग मार्च मुक्काम करेल.वाडा, शहापूर, ठाणे, पालघर, विक्रमगड येथील हजारो शेतकरी उद्या दिनांक 8 मार्च रोजी आटगाव ता. शहापूर येथे लॉंग मार्चमध्ये सामील होत आहे.

लॉंग मार्चच्या पुढे पारंपरिक वाद्ये वाजवण्यात येत आहेत. चळवळीची गाणी गायली जात आहे. घोषणांनी वातावरण दुमदुमून निघत आहे.किसान सभेचे डॉ अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, विजू कृष्णन, किसन गुजर, डॉ अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, सिद्धप्पा कलशेट्टी, बारक्या मांगात, रडका कलांगडा आदी लॉंग मार्चचे नियोजन व नेतृत्व करत आहेत. महिला शेतकरीही लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.

लॉंगमार्च मध्ये प्रत्यक्ष सामील होऊ न शकलेल्या शेतकऱयांनी लॉंग मार्चच्या समर्थनार्थ आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयावर निदर्शने करून, निवेदने देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन किसान सभेने केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.