शेतकरी संतापला , मालाला भाव नाही भाजीपाला रस्त्यावर ; बाजार समित्या बंद

नाशिक : भाजीपाल आणि कांद्याला कावडी मोल भाव मिळाला यामुळे आज शेतकरी संतापलेला पाहिला गेला. अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाने एकत्र येत रस्त्यावर ताजा भाजीपाला फेकून देत सरकार विरोधात घोषणा केल्या आहेत.farmers angry agitation all over district nashik news bajar samiti 

कळवण येते  शेतमालाला भाव नाही, सर्वच बाजूंनी होणारी फसवणूक,कांदा भावात सातत्याने होणारी घसरण यामुळे अस्वस्थ बनलेल्या शेतक-यांनी बुधवारी (दि.२८)रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातूनसंताप व्यक्त केला. येथील कांदा लिलाव बंद करु न संतप्त शेतकरी बांधवांनी कळवणच्या एस. टी. बस स्थानकाजवळ सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करु न शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले.farmers angry agitation all over district nashik news bajar samiti 

कांद्याला क्विंटलला अत्यल्प 105रुपये असा भाव मिळाल्याने भाजपचे आमदार माननीय डॉ राहुल आहेर यांच्या होमग्राऊंड देवळातील पाच कंदील रस्त्यावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला निषेध केला आहे. तर दुसरीकडे शहरातील  गरवारे पॉईंट, येथील मुंबई महामार्गावर शेतकऱ्यांनी फ्लॉवर, कोबी रस्त्यावर फेकत रास्तारोको केला होता. जवळपास तास भर बाहतूक अडवून धरली होती, मालाला हमीभाव द्यावे, दीडपट उत्पन्न वाढीसाठी सरकारी धोरण असावे व कांद्याला भाव मिळावा अश्या नेक मागण्या यावेळी केल्या.farmers angry agitation all over district nashik news bajar samiti 

शासन आदेश तसेच बाजार समितीच्या निर्णयानुसार कांदा विक्रीचे रोख पैसे मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मालेगाव बाजार समिती समोर गेटबंद आंदोलन करित ठिय्या दिला. यावेळी समितीचे सचिव अशोक देसले यांनी आंदोलकांशी चर्चा केली.कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांची उप बाजार समिती मुंगसे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा लिलावानंतर मिळणार 50 % टक्के रक्कम देतात आणि उर्वरित 50 %टक्के रकमेची कुठल्याही प्रकारची हमी देत नसल्याच्या कारणावरून संतप्त शेतकऱ्यांनी उत्पन्न बाजार समिती मालेगाव येथे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांचा मुख्य प्रवेश बंद केला प्रशासनाला धारेवर धरलं आणि बाजार समितीने यावर तोडगा न काढल्यास 100% मार्केट मधील लिलाव बंद करण्याचे यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.

 

farmers angry agitation all over district nashik news bajar samiti 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.