ylliX - Online Advertising Network

शेतकरी संकटात : कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वेखाली शेतकऱ्याची आत्महत्या

रेल्वेखाली येवून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीला कंटाळून पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. येवला येथील उंदीरवाडी गावातील शेतकरी आहे.

यामध्ये पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पिंपळगाव जलाल शिवारातील रेल्वेलाइनवर  शेतकरी बापूसाहेब अण्णासाहेब सोनवणे (देशमुख) यांचा मृतदेहआढळून आला. त्यांचा मृतदेह रविवार, दि.१८ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास रेल्वेखाली एकजण सापडून मृत झाल्याची सूचना पोलिसांना रेल्वे जिल्हा प्रशासनाला  मिळाली होती.

ओळख पटावी म्हणून काही गोष्टी पोलिसांनी दिल्या होत्या तेव्हा १९  जून  रात्रीच्या  तपासामध्ये सदर मृतदेह उंदीरवाडी येथील बापूसाहेब सोनवणे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये  पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मयत बापूसाहेब यांच्या खिश्यामध्ये त्यांच्या जमीनीचा सातबारा व स्वत:चा पासपोर्ट साईज फोटो पोलिसांना मिळाला आहे.  मयत शेतकरी बापूसाहेब यांच्यावर पावणेदोन लाखाचे तर मुलाच्या नावावर लाख रुपयांच्या आसपास सोसायटीचे कर्ज आहे. तर काही लाखांचे असून खाजगी सावकारचे देखील आहे.

कर्ज फेडण्यासाठी जमिनीचा एक तुकडा विकण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा होती. आर्थिक ओढाताणीमुळे बापूसाहेब यांनी आत्महत्या केल्याचा संशय नातलग व्यक्त करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.