ylliX - Online Advertising Network

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली
नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे. त्यामुळे कांदा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे आलेल्या नैराश्यातून शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी इच्छा मरणाची परवानगी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.  नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मागील महिन्यात कांदा भावाच्या घसरणीमुळे काढणीला आलेले पाच एकर कांदा पीक स्वतः जाळून टाकले होते. याबाबत अनेक नेते मंडळींनी भेटी घेतल्या. मात्र काही उपयोगच झाला नाही. त्यामुळे शेवटी कंटाळून डोंगरे यांनी इच्छा मरणाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
===============
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.