Farmer Murder कांदा उठला जीवावर, शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खून

कांदा चोरीने शेतकरी हैराण झाले असताना, आता कांदा रोप वाटणीवरून एकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. येवला तालुक्यात एका शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना तालुक्यातील कोळगाव येथे घडली आहे. या मृत इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून, घटना काल रात्री उशिरा  घडली असून पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.Farmer Murder

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येवला तालुक्यातील कोळगाव ते राजापूर या दोघांच्या मधील रस्त्यालगत कानिफनाथ डोंगराजवळ रात्रीच्या सुमारास संतोष त्र्यंबक मोरे (२५) या इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खून झालेल्या मोरे यांच्या जवळ कांद्याचे लागणीसाठी असलेले रोपाचे पोते आढळून आले, त्यावरून प्राथमिक अंदाजानुसार कांदा रोपाच्या वाटणीवरून किंवा त्यातील पैशाच्या देवाणघेवाण वरून जोरदार  झटापट होऊन अज्ञात इसमाने संतोष मोरे या व्यक्तीचा खून केला असावा असा पोलिसांचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सदर मयत व्यक्ती ही मुळूबाई घाटा जवळील वस्तीव रहिवासी आहे. घटनास्थळी मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक साळवे, येवला तालुका पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी.बी. राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले, पोलीस हवालदार पाटील, पोलीस नाईक केदारे,पोलीस कॉन्स्टेबल दिपक सांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.Farmer Murder

आजचा कांदा भाव , कृपया लिंक क्लिक करा.
https://www.facebook.com/NashikOnWeb/
आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.