Farmer Help शेतकऱ्यांना मदतीबाबत वास्तववादी माहिती सादर करा – मुख्यमंत्र्यांचे आदेश

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठोस मदत करण्यासाठी आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.(Farmer Help)

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीस मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉ.नितीन राऊत उपस्थित होते. (Farmer Help)

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत वास्तववादी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारताना महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य करायचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांना आपले वाटेल या दिशेने प्रयत्न असतील.

सर्वांना अभिमान वाटावा अशा रायगड संवर्धनाच्या 20 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रथम मंजूरी देण्याचे भाग्य मिळाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.(Farmer Help)

मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सचिवांशी संवाद

 ‘हे माझं सरकार ’ अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण व्हावी असे काम करा. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयात राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. (Farmer Help)

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या कार्यालय प्रवेशासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन फुलांनी सजविण्यात आले होते. प्रवेशाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदींनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.

यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विविध विभागांच्या सचिवांशी संवादही साधला. ‘राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाची जोड मिळाल्यास प्रगती होते. त्यामुळे जनतेच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Farmer Help शेतकऱ्यांना मदतीबाबत वास्तववादी माहिती सादर करा – मुख्यमंत्र्यांचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.