Nashik Municipal Corporation नाशिक महापालिका या अधिकाऱ्याच्या नावे फेक फेसबुक प्रोफाईल, पैशांची मागणी

नाशिक : नाशिकमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी संतोष नागरगोजे यांचंही बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. नागरगोजे यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Nashik Cyber Crime Fake Facebook Profile of Municipal Corporation Officer)

विविध मार्गांनी नागरिकांना जाळ्यात अडकवून पैशांची मागणी केली जात असल्याच्या घटना हल्ली वाढल्या आहेत. नाशिकमध्येही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी बघता सायबर सेल अलर्ट मोडवर आहे.

नाशिक पोलीस आयुक्तांचं आवाह

नुकतंच, नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी संतोष नागरगोजे यांचं फेक फेसबुक प्रोफाईल तयार करुन त्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांवर विश्वास न ठेवता कोणालाही आपल्या बँकेच्या डिटेल्स देऊ नयेत, ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करु नये, असं आवाहन नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केलं आहे.Nashik Municipal Corporation

news photo is a symbolic. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.