नाशिक : धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील घटनेत मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मृत व्यक्तिंच्या परिवाराला मदतीच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. fadnavis announces Five lakhs relief aid families rainpada victims dhule
साक्री : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू
राईनपाडा येथील घटना अत्यंत दु:खदायी आहे. संशयाच्या बळावर पाच लोकांची निर्घुण हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि अतिशय निर्घुण प्रकारची घटना आहे. त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अटकेची कारवाईदेखील करण्यात येत आहे. fadnavis announces Five lakhs relief aid families rainpada victims dhule
मुलांना पळवणारी टोळी आल्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका : पोलीस
काही लोक जाणिवपूर्वक अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर लक्ष देण्याविषयी पोलिसांना लक्ष देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे चुकीचे आहे. म्हणून यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा होऊ नये असा प्रयत्न शासनातर्फे करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.
आमचे फेसबुक पेज लाईक करा… https://www.facebook.com/NashikOnWeb/