ylliX - Online Advertising Network

फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर आर्थिक घोटाळा :फडणीस अटकेत १० दिवस कोठडी

फडणीस  ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडणीस  इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून पैसा दाम दुप्पट करणार असे भासवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणुक केलेल्या विनय प्रभाकर फडनिस याला पोलिसांनी विक्रोळी  मुंबई  येथून अटक केली आहे. तर मुंबई नाका पोलिस स्टेशन येथे सुधिर नागेश हिंगे (६५) खोडेनगर यांनी फिर्याद दिली असून त्यांची एकूण १० कोटी ४३ लाख ७२ हजार रुपयांची फडणीस ग्रुप  फसवणूक केली असून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तर पोलिसांनी आज विनय फडणीस याला आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर न्यायालयात आज फडणीस याला हजर केले असता अनेक गुंतवणुकदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली, यावेळी त्यांनी जोर जोरात घोषणा देत न्यायालय परिसर दणाणून सोडले होते. त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त पोलिस बोलवावे लागला होता.

फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2000 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा  किंवा अधिक रुपयांचा हा घोटाळा उघड झाला आहे.झटपट श्रीमंती साठी अनेकांनी लाखो कोट्यावधी रुपये गुंतवले होते. तर या प्रकरणात जवळपास २०० तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत.

या प्रकरणात ३०/०९/२०१६ रोजी फडणीस ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडनिस इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात अनेक  गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी फिर्याद दिली  होती  त्या अंतर्गत गुरनं २६३/२०१६  ब भादविक ४२०,४०९,४०६, १२० ब  सह  महाराष्ट्र गुंतवणुकदारांचे  हितसंरक्षण    कायदा१९९९  कलम ३ व ४ नुसार गुन्हा  दाखल आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे  शाखा करणार आहे. मुख्य संशयित ताब्यात आल्याने पोलिसांना तपास योग्य पद्धतीने आणि वेगात करता येणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.