ylliX - Online Advertising Network

फेसबुकवर ओळख, व्यवसायाचे आमिष ४१ लाख रु. फसवणूक

नाशिक : सोशल मिडीयाचा वापर करत अनेकांची फसवून झालेली आहे. अनेक उदाहरणे असताना सुद्धा फसवणूक सुरूच आहे. असाच प्रकार समोर आला असून फेसबुकवर ओळख करत व्यवसाय आणि त्यातील फायद्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकास तब्बल ४१ लाख रुपयांना फसविले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तापास सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे की, फेसबुकद्वारे ओळख झालेल्या एका परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवू दाखवले होते. त्यात त्या महिलेने या इसमास तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.  प्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विदेशी महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

इंदिरानगर परिसरातील सुयश टेरेस अपार्टमेंटमधील रहिवासी प्रमोद पांडूरंग मोरे (४७) यांचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय करतात. तर त्याच्या व्यवसायाची त्यांनी इंडिया मार्ट या साईटवर नोंदणी केली असून युनायटेड किंगडम अर्थात युके या देशातील संशयित डॉ़ख्रिस्ती जून्स या महिलेने जून २०१७ ते आतापर्यंत +४४७५३४९९३८५४ व ४४७५५४९६३२८९ या क्रमांकावरून मोरे यांना फोन करत  केला व केंट फार्मास्युटीकल्स (यूक़े़)कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नॅस्ट्रोजेन सीड्स या बियांची मागणी केली़ मात्र, याबाबत माहिती नसल्याने त्यांनी या महिलेकडे विचारणा केली असता तिने दिल्लीतील प्रियंका शर्मा या महिलेचा मोबाईल नंबर दिला़

प्रियंका शर्मा या महिलेच्या मोबाईलवर ०८३७५८७६९४९ संपर्क केल्यानंतर तिने दिल्लीतील ग्लोबल एंटरप्रायजेसमधून बोलत असल्याचे  सांगितले होते. या बियांची पाकिटे खरेदी करायची असली तर  करण्यासाठी १ लाख २८ हजार रुपये दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्रमांक ०७२००५००१५७७ मध्ये भरण्यास सांगितले होते. मोरे यांनी आपल्या पिंपळगाव बसवंत येथील खासगी बँकेतील खाते क्रमांक ०७०१२१२००००३८५ वरून आरटीजीएस केली़ होते. मोरे यांना आपल्या मॉरिस मूर नावाच्या कंपनीतून बायहॅण्ड पर्चेस आॅर्डर देतो असे सांगितले़. मुंबईतील गोरेगाव स्टेशन येथून त्यांना मिळालेल्या आॅर्डरमध्ये बियांची आणखी २० पाकिटे घेण्यास सांगितले आणि विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगित होते. जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ बँक खात्यावर ४१ लाख ६४ हजार ५९५ रुपये भरले आहेत़. मात्र न कोणता फायदा न कोणत्या बिया आपली फसवणूक झाली हे मोरे यांना कळून चुकले, मात्र त्यांनी संपर्क केला तेव्हा त्यांना आता कोणतेही उत्तर मिळत नाहीत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली फसवणूक होत असेल झाली असेल तर त्वरित पोलिसाकडे संपर्क करा. सोशल मिडीया माध्यमातून कोणता व्यवहार करू नका .

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.