कांदा व्यापाऱ्यांचा हवाला व्यवहारांशी संबंध उघड 

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा हवाला व्यवहारामध्येही संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाकडून छापे मारण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासणीमध्ये सदरची बाबत उघड झाली आहे. आता तपासणीमध्ये हवाला व्यवहाराशी संबंध असणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर ईडी अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . यावेळी दुबई आणि अरब राष्ट्रात कांद्याची बोगस निर्यात केली जात असल्याचेही समोर आले आहे.

तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह चोवीस व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापे टाकले गेले. यावेळी झालेल्या तपासणीतून  कांदा व्यापारी कोट्यावधी रुपयांची रोकड हवाला मार्फत पाठवत असल्याची संशयास्पद कागदपत्रे समोर आलेली आहेत. यात प्रमुख कांदा व्यापारी संघाचे अनेक पदाधिकारी ईडीच्या रडाराव आहेत.  अशाप्रकारे अनेक जण मोठा नफा कमवत असल्याचे दिसून आले आहे. तपासणीमध्ये व्यापाऱ्यांनी  बेहिशेबी मालमत्ताहवाल्याचा व्यवहार आणि  3 टक्के प्रति दराने दिलेले कर्ज असे अनेक प्रकार उघड झालेले आहेत. आता सदरच्या व्यापाऱ्याची कसून चौकशी केली जात आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.