अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या समस्या : भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे निवेदन

नाशिक : पुणे विद्यापीठ, अभियांत्रिकी आणि पुरांतापासनी यांचे ग्रहण कधीही न सुटणारी समस्या आहे की काय असे वाटू लागले आहे. दरवर्षी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्तपासणी निकाल जाहीर करण्यास पुणे विद्यापीठ दिरंगाई करते व यामध्ये विद्यार्थ्यांचे तीन ते चार महिने वाया जावुन शैक्षणिक नुकसान होते. पुढील सेमिस्टरमध्ये तोच पेपर पुन्हा दिल्यानंतर कधीतरी निकाल लागण्याच्याही घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर या समस्येबद्दल प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्तपासणी निकाल एक महिन्याच्या आत लावण्यासंदर्भात भाजपा युवामोर्चा विद्यार्थी आघाडीतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक विभागीय प्रभारी व्यवस्थापक एस.एम. सोनार यांना निवेदन देण्यात आले.

sppu university of pune uni_New_Logo

नुकताच प्रथम वर्ष अभियांत्रिकिच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. तरी या निकालात अनेक विद्यार्थी काही क्रेडीटने किंवा काही विषयांनी अनुत्तीर्ण झालेले आहेत. या विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीची फॉर्म भरुन मागणी केलेली आहे. तरी या विद्यार्थ्यांची पुनर्तपासणी लवकर करुन एक महिन्याच्या आत या पुणर्तपासणीचा निकाल लावावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एक महिन्याच्या आत निकाल लावणे गरजेचे आहे कारण विद्यार्थी पुनर्तपासणी परिक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढच्या वर्गाचा अभ्यास करणे सोपे होईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणे शक्य होईल, अशी मागणी युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड. अजिंक्य साने, अमित घुगे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश आहेर यांनी केली.

या विषयी युवा मोर्चा नाशिकचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे शिक्षणमंत्री मा.ना.श्री.विनोद तावडे यांची भेट घेणार आहे.

याप्रसंगी सुमित नहार, पुजा साळवे, निखीलेश गांगुर्डे, श्रेयस पाटील,अनिकेत धुमने, पवन उगले, कुणाल निफाडकर, हर्षद राऊत,प्रतिक राऊत, अभिषेक कदम व युवा मोर्चा पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.