ylliX - Online Advertising Network

नाशिक येथे रोजगार व उद्योजकता मेळावा, नामांकीत कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहणार

नाशिक : नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार व स्वंयरोजगार उपलब्ध होण्यासाठी 28 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9.30 ते  दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.Employment Entrepreneurship Meet Nominated Companies  Employers Will Attend 

रोजगार व उद्योजकता मेळाव्यासाठी नामांकीत कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहणार आहेत. स्वंयरोजगारसाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असून कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहरात कौशल्य विकास अंतर्गत मोफत प्रशिक्षण उनलब्ध असून याबाबत संबधित संस्थाचे स्टॉल लावून मार्गदर्शन व नोंदणी करण्यात येणार आहे.. Employment Entrepreneurship Meet Nominated Companies  Employers Will Attend 

इच्छुक उमेदवारांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर, मुंबई नाका, नाशिक येथे किमान पाच प्रतीत  बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणीसह मुलाखतीस उपस्थित रहावे. उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा मोबाईलधारकांनी ‘महास्वयंम’ ॲपवर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधारक्रमांक पडताळणी करावी.Employment Entrepreneurship Meet Nominated Companies  Employers Will Attend 

भरती इच्छुक नियोक्ते व उद्योजकांनी जास्तीत जास्त रिक्तपदे संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 0253-2972121 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

Employment Entrepreneurship Meet Nominated Companies  Employers Will Attend 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.