बांधकाम कर्मचाऱ्याला विजेचा जबर धक्का, मात्र प्राण बचावले
नाशिक :प्रतिनिधी
इंदिरानगर येथे विजेच्या खांबावर काम करत असतांना कर्मचारी मृत झाला होता, ही घटना ताजी असतांना आज पुन्हा एकदा एका फॅब्रीकेशनचे काम करणाºया कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला आहे. मात्र सुदैवाने वेळेत हॉस्पिटल मध्ये उपचार झाले आणि त्याचे प्राण वाचले आहेत.
बागवानपुरा जुने नाशिक येथे घोडेस्वार बाबा चौकामध्ये घराचे बांधकाम सुरू आहे. या घरावर पत्रे बसविले जात आहेत. त्यामध्ये असताना फॅब्रीकेशनचे काम सुरु आहे.
नईम बशीर शेख (३०रा.कथडा) हा युवक फॅब्रीकेशन करत लोखंडी पत्रे बसवित होता. यावेळी त्याचा संपर्क अवघ्या एक फूटावर असलेल्या महावितरणच्या अतीउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांशी आला होता. त्यात धक्का इतका जाब होता की शॉक लागून तो दूर उडून फेकला गेला होता. त्यावेळी नागरिकांना ही बाब लक्षात आली आणि त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. वेळेत नेल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.