विधानसभा : जिल्ह्यातून 243 उमेदवारांनी 345 नाम निर्देशनपत्र दाखल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज जिल्ह्यातून 171 उमेदवारांनी 256 नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच आजअखेर एकुण 243 उमेदवारांनी 345 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

123 नाशिक पूर्व व 124 नाशिक मध्य मतदारसंघासाठी निवडणुक निरीक्षक रणजितकुमार यांची  नियुक्ती

 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 123 नाशिक पूर्व व 124 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणुन रणजितकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405308529 असुन उपरोक्त दोन्ही मतदार संघातील नागरिकांच्या समस्या समक्ष जाणून घेण्याकरीता किंवा तक्रार ऐकून घेण्याकरिता सकाळी 9 ते 10 या कालावधीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सुट क्रमांक 1 या ठिकाणी उपलब्ध राहतील. वरील भ्रमणध्वनीवर संपर्क SMS/Whatsapp वर तक्रारीची दखल घेण्यासाठी कायम उपलब्ध राहतील तरी नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे निरसन करुन घेण्याचे आवाहन 123 नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

—–

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.